आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?-नारायण राणे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनच्या पायऱ्यांवरून जात असताना तिथे भाजपचे आमदार आंदोलन करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. हे प्रकरण अधिवेशनात चांगलंच गाजलं. भास्कर जाधव यांनी यावरून नितेश राणेंच्या निलंबनाचीही मागणी केली. आता या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत […]
ADVERTISEMENT

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनच्या पायऱ्यांवरून जात असताना तिथे भाजपचे आमदार आंदोलन करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. हे प्रकरण अधिवेशनात चांगलंच गाजलं. भास्कर जाधव यांनी यावरून नितेश राणेंच्या निलंबनाचीही मागणी केली. आता या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?
काय म्हणाले नारायण राणे?
‘आदित्य ठाकरे यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. मांजराचा आवाज कोण काढतं? आदित्य ठाकरेंचा काही संबंध आहे का? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्यावर करतं. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे आणि ते तसं बोलतात का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे.