शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर नागरिकांना कोट्यवधींचा गंडा, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
शेअर बाजारात पैसे गुंतवून जास्तीच्या व्याजदराचं अमिष दाखवून शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. चकेश जैन असं या आरोपीचं नाव असून आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर तो डोंबिवली सोडून उत्तर प्रदेशात पळून गेला होता. यानंतर डोंबिवली पोलिसांच्या पथकाने तपास करत गाझियाबादमधून आरोपीला अटक केली. चकेश जैन हा डोंबिवली पूर्व भागात राहत […]
ADVERTISEMENT
शेअर बाजारात पैसे गुंतवून जास्तीच्या व्याजदराचं अमिष दाखवून शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. चकेश जैन असं या आरोपीचं नाव असून आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर तो डोंबिवली सोडून उत्तर प्रदेशात पळून गेला होता. यानंतर डोंबिवली पोलिसांच्या पथकाने तपास करत गाझियाबादमधून आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT
चकेश जैन हा डोंबिवली पूर्व भागात राहत होता. शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करुन जास्त व्याजदराचं अमिष दाखवत त्याने लोकांकडून पैसे गोळा केले. जास्तीच्या व्याजापोटी काही नागरिक चकेशच्या जाळ्यात अडकले देखील…परंतू पैसे गुंतवून बराच कालावधी उलटूनही व्याजदर सोडा पण गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
Shocking : नाशिकमध्ये अभ्यास न करणाऱ्या मुलाचा खून करून आईने केली आत्महत्या
हे वाचलं का?
याप्रकरणी आदर्श गावडे यांनी डोंबिवलीच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर चकेशने अनेकांना गंडा घातल्याचं लक्षात आलं. तपासादरम्यान चकेश उत्तर प्रदेशात पळून गेल्याचं लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी गाझियाबादमध्ये पथकाला पाठवून आरोपीला अटक केली आहे. गुंतवणूक केलेले पैसे आरोपी शेअर बाजारात लावत होता. ACP जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
Pune: ‘बहिणीच्या लग्नाला जाऊ का?,’ विचारताच डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे केसच कापले!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT