Dombivli: राम मंदिराच्या पुजाऱ्याला भाजप माजी नगरसेवकाच्या मुलाने केली शिवीगाळ
Dombivli Crime News Today : पिण्याच्या पाणी प्रश्नावरून डोंबिवलीतील दावडीत एक वाद उफाळून आला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, भाजपच्या नगरसेवक पुत्राने राम मंदिरातील पुजाऱ्याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या शहरभर चर्चा रंगलीये. मात्र नगरसेवकाने असं काही घडलं नसल्याचं म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या 27 गावांतील […]
ADVERTISEMENT
Dombivli Crime News Today : पिण्याच्या पाणी प्रश्नावरून डोंबिवलीतील दावडीत एक वाद उफाळून आला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, भाजपच्या नगरसेवक पुत्राने राम मंदिरातील पुजाऱ्याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या शहरभर चर्चा रंगलीये. मात्र नगरसेवकाने असं काही घडलं नसल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या 27 गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी गावात याच पाणी प्रश्नावरून रणकंदन माजले. स्थानिक माजी नगरसेवकाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते तर ही समस्या आज उद्भवली नसती, असे वक्तव्य दावडी गावातील एका मंदिराच्या पुजाऱ्याने केले.
दरम्यान, या पुजाऱ्याला माजी नगरसेवकाच्या पुत्राने लक्ष करून शिवीगाळ करत मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे या भागातील पाण्याच्या प्रश्नावरून अचानक उद्भवलेला हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.
हे वाचलं का?
चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..
भाजपच्या माजी नगरसेवकांच्या मुलाकडून पुजाऱ्याला शिवीगाळ? नेमकं काय घडलं?
कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी गाव व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील हे काही रहिवाशांशी चर्चा करत होते. या परिसरात असलेल्या राम मंदिराचे पुजारी हरिशंकर पांडे यांनी मात्र माजी नगरसेवक पाटील यांना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
पाणी समस्येला नगरसेवक जबाबदार आहे. नगरसेवकाने प्रयत्न केले असते तर हा प्रश्न सुटला असता. पाणी समस्येकरिता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, असे पुजारी पांडे यांनी वक्तव्य केले.
Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत
ADVERTISEMENT
‘तुला मारणार’, पुजाऱ्याने काय केला आरोप?
ही चर्चा भाजपाचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. जालिंदर पाटील यांनी पुजारी पांडे यांना जाब विचारला. पाटील यांचा मुलगा दीपेश याने तर पुजारी हरीशंकर पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.
‘माझ्या वडिलांची बदनामी का करतो?’, असा जाब विचारत ‘तुला मारणार’, अशी धमकी दिल्याचा दावा पुजारी पांडे यांनी केला आहे. या प्रकरणी पुजारी पांडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Kalyan: धावत्या लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वृद्धाची हत्या?
माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांनी मात्र असा प्रकार घडलेला नसल्याचे सांगून जे काही झाले ते गैरसमजातून झाले आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी काय आणि किती प्रयत्न केले हे सगळ्यांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT