तब्बल 31 मोबाइलसह चोरट्याला पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवली: रस्त्याने चालणारे नागरिकांचे जबरीने मोबाईल लंपास करून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. तसेच त्याच्याकडून 31 मोबाईल देखील हस्तगत केले आहेत. अशी माहिती डोंबिवलीचे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

डोंबिवली, कोळसेवाडी, मानपाडा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल होत होत्या. फिर्यादी रामकुमार मुन्सी सिंह 22 ऑगस्ट रोजी सकाळी पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील गेट समोरील रोडवर पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांच्याकडील मोबाईल जबरीने खेचून पळून गेला.

याबाबत राजकुमार यांनी मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार केली. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, प्रवीण किनरे, दीपक गडगे आदी पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी सुफियान बागवान याला भिवंडीच्या नई बस्तीमधून पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक केली आहे.

हे वाचलं का?

मानपाडा पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करत तपास चालू केला आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरी करणारा सराईत चोरटा सुफीयान उर्फ सद्दो मलीक बागवान (25) याला भिवंडीच्या नई बस्तीमधून पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक केली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 3 लाख 40 हजार रूपये किंमतीचे एकूण स्मार्ट मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली एक ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली. आरोपी बागवान याचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचाही पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे.

ADVERTISEMENT

लॉकडाउनमुळे काम बंद, पैश्यांसाठी हॉटेलचे कुक बनले मोबाईल चोर

दरम्यान, कल्याण-डोंबिवली भागात मोबाइल चोरी, चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता मानपाडा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.

मुंबईच्या शेजारील कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT