शिंदे गट म्हणू नका शिवसेना एकनाथ शिंदेंचीच- तानाजी सावंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते भैय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला आहे. या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिंदे गट, अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे असे सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

आरोग्य मंत्री तानाजी सावंत काय म्हणाले?

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे शिंदे गटाकडून सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. मात्र शिंदे गट, अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे.आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे. ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत, विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केले, तो विचार कुणी तरी सोडला होता. तो विचार घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येतोय. भविष्यात देखील तीच विचारधारा घेऊन आम्ही जनतेची सेवा करू असेही तानाजी सावंत यांनी म्हणाले.

तानाजी सावंत मागच्या काही दिवसांपासून चर्चेत

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हाफकीन माणासाकडून औषधं घेणं बद करा असं वक्तव्य केलं. तशा आशयाचं वृत्त एका वृत्तपत्रात छापून देखील आलं. तेव्हापासून सावंत चर्चेत आले आहे, त्यांच्या सर्वच माध्यमातून टीका केली जात आहे. त्यानंतर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ”मी मुर्ख आहे का? मी डॉक्टर आहे. मी पिएचडी होल्डर आहे तसेच रँकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. मीडिया मुद्दाम टार्गेट करुन दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे”.

हे वाचलं का?

दसरा मेळाव्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारा- तानाजी सावंत

दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेकडून मेळावा कोण घेणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. कारण दोन्ही गटांकडून मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत. याविषयी तानाजी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले याविषयी एकनाथ शिंदेंना विचारा.

सोलापूर दौऱ्यादरम्यान तानाजी सावंतांविरोधात घोषणाबाजी

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मोहोळ दौऱ्यावेळी युवासेनेकडून सावंतांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरले. मोहोळ शहरात मंत्री सावंत यांच्या आगमनावेळी युवासैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. मोहोळमधील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सावंत आणि शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT