यंदाच्या ईदला घराबाहेर जमाव करू नका; सलमान खानचं चाहत्यांना आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता सलमान खानचा दरवर्षी एक सिनेमा ईदवर रिलीज होतो. यावर्षी त्याचा ‘राधे’ हा सिनेमा रिलीज होतो. दरवर्षी सलमानच्या घराबाहेर त्याचे चाहते एकत्र जमतात. सलमानसुद्धा त्याच्या घराच्या बाल्कनीत त्यांना भेटायला येतो. पण गेल्या 2 वर्षांपासून सलमान तसं करत नाहीये. याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरस. तर आता गेल्या वर्षाप्रमाणे सलमानने यावर्षीही चाहत्यांना ईदी देऊ शकणार नाही. यावर्षी देखील सलमान खानने चाहत्यांना घराबाहेर एकत्र न येण्याचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

एका मुलाखतीदरम्यान सलमानने गेल्या वर्षापेक्षाही यंदाच्या ईदचा प्लॅन फार वेगळा असल्याचं म्हटलंय. सलमान म्हणाला, “यावर्षी घरातील प्रत्येकजण त्यांच्या खोलीत असेल. मी घरामध्ये खालच्या खोलीत राहतो आणि आई वडील वरच्या मजल्यावर असतात. मला आशा आहे की यावर्षी घराबाहेर चाहते जमाव करणार नाही. इतकंच नाही तर कोणत्याही सेलेब्रिटींच्या घराबाहेर गर्दी जमणार नाही.”

काही काळापूर्वी कोरोनाच्या केसेसमध्ये झालेली घट पाहता सलमानने आपला ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा रिलीज करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर रूग्णसंख्येत झालेली प्रचंड वाढ पाहता त्याने निर्मात्यांसोबत ओटीटीच्या प्ल२टफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय हा सिनेमा थिएटरमध्येही प्रदर्शित होणार आहे.

हे वाचलं का?

सलमान खानचा ‘राधे ‘ सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवर रिलीज झाला आहे. ‘पे पर व्हू’ या फॉरमॅटमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. Zee5 अ‍ॅपवर हा सिनेमा 12 वाजता रिलीज करण्यात आलाय. सलमान खान या सिनेमात एका एन्काऊंट स्पेशालिस्टची भूमिका साकारतो आहे. ‘तेरे हिस्सेकी बिर्यानी हम सब मिलकर खाएंगे और बोलेंगे ईद मुबारक’ हा डायलॉग आणि ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर ली तो फिर मै अपने आप की भी नहीं सुनता’ हे डायलॉग ऑलरेडी हिट झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT