माळशेज घाटात दरड कोसळून चारचाकी गाडीचा चक्काचूर
राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात आतापर्यंत अनेक दुर्घटना घडत आहेत. अशाच एका प्रसंगात माळशेज घाटात दरड कोसळून एका चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कारचालक लघूशंकेसाठी बाहेर गेला असल्यामुळे तो थोडक्यात बचावला. विजय म्हात्रे हे ११ जून दरम्यान माळशेज घाटात प्रवास करत होते. या […]
ADVERTISEMENT
राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात आतापर्यंत अनेक दुर्घटना घडत आहेत. अशाच एका प्रसंगात माळशेज घाटात दरड कोसळून एका चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कारचालक लघूशंकेसाठी बाहेर गेला असल्यामुळे तो थोडक्यात बचावला.
ADVERTISEMENT
विजय म्हात्रे हे ११ जून दरम्यान माळशेज घाटात प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांना लघुशंका येत असल्यामुळे ते मुरबाड जवळली बोगद्याजवळ थांबले. याचवेळी दरड विजय म्हात्रे यांच्या गाडीवर कोसळली आणि गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू गाडीची अवस्था पाहता जर गाडीचालक यावेळी गाडीत उपस्थित असता तर नक्कीच दुर्घटना घडली असती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरड हटवत गाडी बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT