Akal Takht Express : विमानानंतर ट्रेनमध्ये विकृत कृत्य, टीसीकडून महिला प्रवाशावर लघवी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

TC’s female passenger urinates : विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना ताजी असतानाच आता ट्रेनमध्ये (Train) एका महिला प्रवाशावर (female passenger) लघवी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये तिकीट (Ticket checker) चेक करणाऱ्या टीसीनेचा हा प्रताप केला आहे. मध्यधूंद अवस्थेत त्याच्याकडून हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर प्रवाशांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी टीसीवर गुन्हा दाखल केला आहे. (drunk tte urinates on women passenger inside in train after plane incident)

ADVERTISEMENT

तख्त एक्सप्रेसमधून एक दाम्पत्य अमृतसर वरून कोलकत्ता असा प्रवास करत होते. या एक्सप्रेसच्या A1 कोचमधून हे दाम्पत्य प्रवास करत होते. रात्रीचे 12 वाजले असल्याने सर्व प्रवाशी आपआपल्या सीटवर झोपले होते. या घटनेतील महिला देखील आपल्या सीटवर झोपली होती.यावेळेस सहारनपुरमध्ये पोस्टेट असलेले टीटीई मुन्ना कुमार ट्रेनमध्ये तिकीट चेकींगसाठी (Ticket checker) चढले होते. तिकीट चेकींग दरम्यान महिलेच्या सीटजवळ येऊन त्याने लघवी केली. ही घटना महिलेच्या पतीने पाहताच आरडाओरड करून त्याला पकडून बेदम मारहाण केली. टीटीईने खुप दारू प्यायली होती, या दारूच्या नशेत त्याच्याकडून ही घटना झाली होती.

VIDEO: मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss, सीरियल किसरची दहशत

हे वाचलं का?

बिहारवरून एक दांपत्य ट्रेनमधून प्रवास करत होते. या प्रवासात चारबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर मु्न्ना कुमारच्या नावाच्या टीसीने महिलेवर लघवी केली. या घटनेची माहिती मिळताच महिलेची तक्रार लिहून घेतली आणि टीसीला ताब्यात घेऊन आयपीसीच्या 352, 354(A), आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जीआरपी सीओ संजीव नाथ यांनी दिली आहे.

नाशिक हादरलं! घरात घुसून गोळीबार, कोयत्याने हल्ला; महिला थोडक्यात बचावली

ADVERTISEMENT

विमानात सहप्रवाशावर लघवी

दरम्यान याआधी न्युयॉर्क वरून दिल्लीत येणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत लघवी केली होती.ही लघवी बाजूलाच बसलेल्या प्रवाशावर गेली होती. आरोपीने खुप दारू प्यायली होती, त्यामुळे तो नशेत होता. या नशेत झोपला असताना त्याच्यकडून बे कृत्य घडले होते. या घटनेनंतर विमानात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी केबिन क्रुकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण दिल्ली पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले होते. अमेरीकन एअरलाईन्सची फ्लाईट AA292मध्ये ही घटना घडली होता. या घटनेनंतर ही फ्लाईट दिल्ली एअरपोर्टवर उतरवण्यात आली होती. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता.

ADVERTISEMENT

चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT