‘अंगुरी भाभी’च्या सासू-सासऱ्यांना अॅक्टिंगमुळे होती अडचण! 19 वर्षांनंतर घटस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे ही ‘अंगूरी भाभी’ म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुभांगी अत्रेच्या लग्नाला जवळजवळ 19 वर्षे झाली आहेत. आता ती तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे.

ADVERTISEMENT

गेल्या 4 वर्षांपासून शुभांगीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या.

ADVERTISEMENT

शुभांगीचे सासू-सासरे तिच्या शोबिज इंडस्ट्रीत काम करण्यावर खूश नव्हते. 4 वर्षांपासून परिस्थिती ठीक नव्हती.

आता शुभांगी गेल्या 1 वर्षापासून पतीपासून वेगळी राहत आहे. पण, मुलीचा सांभाळ पती-पत्नी मिळून करतात.

शुभांगी अत्रेने सांगितलं की, ‘ती आणि पती पियूष पुरी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्यातील मतभेद दूर करू शकले नाहीत.’

‘त्यामुळे एकमेकांना स्पेस देऊन आपापल्या आयुष्यावर, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.’

शुभांगी आणि पियुष वेगळे झाल्याचं पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मागे, पत्नीसाठी करिअर सोडलेल्या पियुषच्या प्रेमाचं उदाहरण आपण पाहिलंय.

शुभांगीच्या अॅक्टिंग करिअरला पाठिंबा देण्यासाठी आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी एकेकाळी पियुषने नोकरी सोडली होती.

पियुष आणि शुभांगी यांची मुलगी 18 वर्षांची आहे. मुलीला वडिलांच्या प्रेमापासून दूर लोटणार नाही, असंही शुभांगीने म्हटलं आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT