‘पाकला घरात घुसून मारलं’; कंगना रणौतकडून कौतुक, जावेद अख्तर म्हणाले,…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Javed akhtar on kangana ranaut : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Famous Writer javed Akhtar) यांनी पाकिस्तानात जाऊन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा ( condemned of 26/11 terrorist attack) निषेध केला. तेथील जनतेला आणि सरकारला आरसा दाखवला. जावेद अख्तरच्या या विधानाने त्यांची प्रतिस्पर्धी कंगना राणौतचेही मन जिंकले. कंगनाने ट्विट करून जावेद अख्तरचे कौतुक केले आणि म्हणाली, घरात घुसून मारले. आता इंडिया टुडेशी संवाद साधताना जावेद अख्तर यांनी कंगना रणौतने केलेल्या स्तुतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. Javed Akhtar react on Kangana Ranaut

ADVERTISEMENT

“ज्यांनी बलात्कार आणि हत्या केल्या त्यांना…” बिलकिस बानो प्रकरणी जावेद अख्तर यांनी व्यक्त केला संताप

कंगना रणौतवर जावेद अख्तर काय म्हणाले?

जावेद अख्तर जास्त न बोलता म्हणाले, काही फरक पडत नाही. काही दिवसात पुन्हा जुन्या झोनमध्ये परत येईल. काळजी करू नका हे काही काळासाठीच आहे. त्यांना कंगनावर फार काही बोलायचे नाही, असे जावेद अख्तर यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले. जावेद यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतच्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कंगनाला महत्वाचं मानत नाही, मग ती महत्त्वाची टिप्पणी कशी करू शकते. तिच्याबद्दल जास्त न बोलता पुढे जाऊद्या, असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

जावेद अख्तर यांच्या कौतुकात कंगना काय म्हणाली?

कंगना रणौतने ट्विटमध्ये लिहिले, ‘मी जेव्हा जावेद साहेबांची कविता ऐकायचे तेव्हा मला वाटायचे की आई सरस्वतीजींची त्यांच्यावर इतकी कृपा कशी आहे. पण बघा, माणसात काही सत्य असतं. म्हणूनच त्यांच्यासोबत देव असतो… जय हिंद जावेद अख्तर साहब. घरात घुसून मारले… हाहाहा. असं ट्विट तिनं केलं आहे.

Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान

ADVERTISEMENT

असत्यावर नाती बनत नाहीत : जावेद अख्तर

इंडिया टुडेसोबतच्या संवादात जावेद अख्तर पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर म्हणाले, जर आम्ही मैत्रीसाठी गेलो होतो, तर याचा अर्थ असा नाही की थोडे खोटे बोलायला सुरुवात केली पाहिजे. नाती खोट्यावर नसून सत्यावर बांधली जातात. आम्ही आमचे सत्य देखील स्वीकारतो. बरं, हा धागा खूप गोंधळलेला आहे. कदाचित भविष्यात दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. जावेद अख्तर यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील फैज महोत्सवादरम्यान त्यांना खूप प्रेम मिळाले. लोक भारताबद्दल खूप प्रश्न विचारायचे. तो एक मोठा हॉल होता, जो 3000 लोकांनी खचाखच भरलेला होता. वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते, असं जावेद अख्तर म्हणाले.

ADVERTISEMENT

पाकिस्तानात जाऊन काय म्हणाले जावेद अख्तर?

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झालेल्या फैज फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर म्हणाले होते, आम्ही नुसरत आणि मेहदी हसन यांच्यासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाही. त्यामुळे वास्तव हे आहे की, आता एकमेकांना दोष देऊ नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसात प्रचंड तणाव कमी झाला पाहिजे. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर कसा हल्ला झाला ते आम्ही पाहिले. ते लोक नॉर्वेमधून आले नाहीत किंवा ते इजिप्तमधून आले नाहीत. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटू नये, असं जावेद अख्तर म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT