खरी शिवसेना कुणाची? ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा! निवडणूक आयोगाचे ठाकरे-शिंदे गटाला निर्देश
खरी शिवसेना कुणाची ८ ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना दिले आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोसळलं. कारण शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झालं आहे. आता शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

खरी शिवसेना कुणाची ८ ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना दिले आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोसळलं. कारण शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झालं आहे. आता शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेही यांनीही शिवसेना आमचीच म्हणणारे लोक जे आहेत त्यांना भुलू नका म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढली आहे. आता शिवसेना नेमकी कुणाची ते सिद्ध करा हे निवडणूक आयोगाने म्हटलंय.
The Election Commission of India asks both Uddhav Thackeray and Eknath Shinde to submit documentary evidence to prove that they have the majority members in the Shiv Sena.
(File photos) pic.twitter.com/HT4geWExXP
— ANI (@ANI) July 23, 2022
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात
शिवसेना आमचीच असं एकनाथ शिंदे गटाने म्हटलं आहे. तसंच शिवसेनेतल्या १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन आमचं म्हणणं ऐकून घेण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून खरी शिवसेना आम्हीच असून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं असं म्हटलं आहे.
आता निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत आवश्यक ती कागदपत्रं जमा करा असं म्हटलं आहे. ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. आता शिवसेनेत जी भली मोठी फूट पडली आहे त्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेतल्या ठाकरे विरूद्ध शिंदे गटाची लढाई सुप्रीम कोर्टातही गेली आहे. १ ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आमचीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याला भुलू नका असं म्हटलं आहे.