एकनाथ खडसेंच्या जावयाला ED कडून अटक, Pune MIDC जमिन व्यवहाराप्रकरणी कारवाई
भाजपचे माजी ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. पुणे एमआयडीसी येथील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ही कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यांची चौकशी संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु होती. चौधरी यांनी आणलेल्या कागदपत्रांचाही […]
ADVERTISEMENT
भाजपचे माजी ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. पुणे एमआयडीसी येथील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ही कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यांची चौकशी संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु होती. चौधरी यांनी आणलेल्या कागदपत्रांचाही ईडीने अभ्यास केला. ही कागदपत्र तपासण्यात आल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केल्याचं कळतंय.
ED officials have arrested NCP leader Eknath Khadse's son in law Girish Chaudhary in the Pune land deal case . He was called in yestwrday morning and the questioning went on till late evening, further he was placed under arrest @sahiljoshii @aajtak @IndiaToday
— Divyesh Singh (@divyeshas) July 7, 2021
ईडीने याच प्रकरणात याआधी एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली होती. यानंतर खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण मागितलं होतं. भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळेच आपल्यामागे ईडीची कारवाई करण्यात येत असल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. ज्यावर कोर्टात आपली बाजू मांडत असताना ईडीने खडसे या प्रकरणात आरोपी नसले तरीही ते चौकशीसाठी येत नसल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते असं सांगितलं होतं.
हे वाचलं का?
काय आहे पुणे MIDC जमिनीचं प्रकरण?
२०१७ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाख खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि जमिनीचा मूळ मालक अब्बास अकानीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एमआयडीसीमधील मोक्याच्या जागेवर असलेल्या जमिनीच्या खरेदी व्यवहारात अफरातफर केल्याचा आरोप खडसेंवर ठेवण्यात आला होता. हेमंत गावंडे यांनी ही तक्रार केली होती. परंतू २०१८ मध्ये अँटी करप्शन ब्युरोने २२ पानांचा एक अहवाल सादर करत खडसेंना क्लिन चिट दिली.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे सुरुवातीला महसूल मंत्री होते. खडसेंवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने जस्टीस दिनकर झोटींग यांच्या समितीची नेमणुक केली होती. या प्रकरणात खडसेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT