shiv sena crisis : शिंदे सरकारला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयात नेमकं घडलं?
शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या आमदारांनाही दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या आमदारांवर निकाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. सत्तांतरानंतर आता शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट असा राजकीय संघर्ष राज्यात बघायला मिळत आहे. […]
ADVERTISEMENT

शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या आमदारांनाही दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या आमदारांवर निकाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत.
सत्तांतरानंतर आता शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट असा राजकीय संघर्ष राज्यात बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या वादासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र याचिका कार्यसूचीत घेण्यात न आल्याने शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै तारीख सुनावणीसाठी निश्चित केली होती, पण याचिका सुनावणीसाठी घेण्यात न आल्याने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रामण्णा यांच्याकडे तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
‘मलाही तिच चिंता वाटतेय’; शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणीआधी शरद पवारांचं विधान