‘रोखठोक’मधील टीका एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी?; उद्धव ठाकरेंना दिली दोन आव्हानं
राज्यात झालेल्या सत्तातरांपासून सामना अग्रलेखाबरोबरच रोखठोक सदरातूनही एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं जातंय. रोखठोकमधून एकनाथ शिंदेंना साबणाचा बुडबुडा म्हटलं गेलं. या टीकेवरून एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना दोन आव्हान दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पैठणमध्ये सभा झाली. या सभेत एकनाथ शिंदेंनी रोखठोकमधून होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला. रोखठोकमधील काही वाक्ये वाचून […]
ADVERTISEMENT

राज्यात झालेल्या सत्तातरांपासून सामना अग्रलेखाबरोबरच रोखठोक सदरातूनही एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं जातंय. रोखठोकमधून एकनाथ शिंदेंना साबणाचा बुडबुडा म्हटलं गेलं. या टीकेवरून एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना दोन आव्हान दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पैठणमध्ये सभा झाली. या सभेत एकनाथ शिंदेंनी रोखठोकमधून होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला. रोखठोकमधील काही वाक्ये वाचून दाखवत शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हानच दिलं.
एकनाथ शिंदे रोखठोकमधील टीकेवर काय म्हणाले?
“कुणीतरी रोखठोकमध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट. शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे. शिंदे गटाने सुंता करून घेतलीये. टीका करण्या पलिकडे त्यांच्याकडे काही उरलं नाहीये. सकाळ, दुपार, रात्री असे टीकेचे तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही”, असं उत्तर शिंदे यांनी दिलं.
Eknath Shinde:”कसं काय पाटील बरं आहे का? दिल्लीत काय घडलं ते खरं आहे का?”










