Thackeray vs Shinde : शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना; ठाकरे गटाला उद्धव ठाकरेंचे नाव!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले आहे. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाला अद्याप कोणतेही चिन्ह देण्यात आलेले नाही.

ADVERTISEMENT

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव सुचविण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही गटांना हे नाव न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानंतर दोन्ही गटांच्या दुसऱ्या पर्यायांवर विचार करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना ही नावं देण्यात आली.

चिन्हांच्या बाबतीतही आयोगाने निर्णय घेतला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून सुचविण्यात आलेले उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याने दोघांनाही नाकारले आहे. याशिवाय शिंदे-ठाकरे गटाने दिलेले त्रिशूळ आणि शिंदे गटाने दिलेले गदा ही चिन्ह धार्मिक असल्याचे कारण देत ती बाद ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे आता शिंदे यांना नवीन चिन्हांचे पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबरच्या रात्री शिवसेनेतील शिंदे-ठाकरे वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही गटांना सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत नवीन नावं आणि मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे 3 पर्याय देण्याचे निर्देश दिले. यानुसार दोन्ही गटांकडून आज दुपारी 1 वाजेपर्यंत नवीन नाव आणि चिन्हांचे 3 पर्याय देण्यात आले होते. यात काही चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीच्या बाहेरची होती.

ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे ३ पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. तर शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावांचा पर्याय सुचविण्यात आला होता. शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा ही चिन्ह आणि शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची असे 3 नावांचे पर्याय देण्यात आले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT