एकनाथ शिंदे गटाचा ठराव; ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप, ‘त्या’ पत्रात नेमकं काय?
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरुन हटवून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने एक ठराव पास केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंनी विधानसभेचे उपअध्यक्ष नरहरी झीरवाळ यांनी ३४ आमदारांच्या सह्यांनी एक पत्र दिले आहे. या पत्रात […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरुन हटवून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने एक ठराव पास केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंनी विधानसभेचे उपअध्यक्ष नरहरी झीरवाळ यांनी ३४ आमदारांच्या सह्यांनी एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडीतील भ्रष्टाचारावर देखील प्रकाश टाकला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा आमच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचा उल्लेख पत्रामध्ये केला आहे.
शिंदेंनी पास केलेल्या ठरावात नेमकं काय?
* एकनाथ शिंदेंना ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधींमंडळ गटनेता म्हणून निवडले गेले.
* २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे युती झाली परंतु सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन करण्यात आले.










