एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत? ट्रायडंटच्या बैठकीत काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेतली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केली आहे त्यामुळे ते आता शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे बंड केलेल्या नेत्यांची हकालपट्टी करणं आणि नव्या नियुक्त्या करणं हे सगळं करत आहेत […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेतली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केली आहे त्यामुळे ते आता शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे बंड केलेल्या नेत्यांची हकालपट्टी करणं आणि नव्या नियुक्त्या करणं हे सगळं करत आहेत अशात एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
काय घडलं आहे ट्रायडंट हॉटेलच्या बैठकीत?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत शिवसेनेच्या १४ खासदारांची उपस्थिती होती. हे सगळे खासदार ऑनलाइन या बैठकीत उपस्थित होते ही माहिती समजली आहे. तसंच आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून करणार कार्यकारिणीची घोषणा करणार आहेत. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आधीच गेले आहेत. अशात आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १४ जण या बैठकीत होते त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटात हे खासदारही येणार हे जवळपास नक्की झालंय. पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा एकनाथ शिंदे करणार यावरूनच हे बोललं जातं आहे की एकनाथ शिंदे आता पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. असं असलं तरीही खासदार राहुल शेवाळे यांनी आपण या बैठकीत नव्हतो असं म्हटलं आहे.
२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले जी बाब चुकीची आहे हे सांगत बंड पुकारलं. त्यांच्या साथीला ४० आमदार आणि अपक्ष ११ आमदारही गेले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच भूकंप आला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशा सगळ्या राजकीय घडामोडी एका पाठोपाठ एक घडत असतानाच शिवसेनेला सुरुंग लागला हे महाराष्ट्राने पाहिलंच.
हे वाचलं का?
या सगळ्या गोष्टी घडत असतानाच राष्ट्र्रपती पदाची निवडणूक आली. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा द्यावा अशी भूमिका खासदारांनी घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी जरी या गोष्टीचा इन्कार केला असला तरीही खासदारांनी जो दबाव टाकला त्यामुळेच हा पाठिंबा देण्यात आल्याची चर्चा आहे. आता १९ पैकी १४ खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. तसंच एकनाथ शिंदे हे पक्ष ताब्यात घेण्याची तयारीच करत आहेत असंच दिसून येतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT