मास्टरस्ट्रोक! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. इतकंच नाही तर आज त्यांचा एकट्याचाच शपथविधी होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आज फक्त त्यांचा शपथविधी होईल त्यानंतर शिवसेनेचे इतर आमदार, आमचे आमदार यांच्यापैकी ज्येष्ठष वरिष्ठ लोक आहेत त्यात ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल त्यांना आम्ही मंत्रीपद देणार आहोत असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर रोज वीर सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधे महाराष्ट्राच्या प्रगतीला ब्रेक लागला होता. मात्र आता हिंदुत्ववादी विचारांच सरकार महाराष्ट्रात येतं आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत आहेत याचा आम्हाला आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या कॅबिनेटमध्ये संभाजी नगर, धाराशिव, दी. बा. पाटील हे निर्णय घाई घाईने घेतले. एक तर फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितल्यानंतर कॅबिनेटची बैठक घ्यायची नसते. तरीही मिटिंग घेऊन हे निर्णय घेण्यात आले. त्याचं काय होतं ते वैध ठरतात का ते पाहावं लागेल.मात्र या निर्णयांच्या आम्ही सोबतच आहोत असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका मोठ्या गटाची कुचंबणा होत होती. आमच्याच मतदार संघात आमचे हरलेले विरोधक त्यांना रोज निधी मिळत असेल तर कसं चालेल? काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा असा निर्णय या गटाने घेतला.

ADVERTISEMENT

दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी या आमदारांऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीलाच महत्त्व दिलं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मी अडीच वर्षे सांगत होतो की हे सरकार पडेल. एकनाथ शिंदे यांचा विधीमंडळ गट, अपक्ष आमदारांचा विधीमंडळ गट या सगळ्यांचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत. ही विचारांची लढाई आहे, हिंदुत्वाची लढाई आहे त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देतंय आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा करण्यात आली आहे. तसंच मी मंत्रिमंडळात नसणार आहे. मी यापासून लांब राहणार आहे. मात्र सरकार कसं व्यवस्थित चालेल याकडे माझं लक्ष असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT