एकनाथ शिंदे विदर्भात उद्धव ठाकरेंना देणार धक्का?’ दौऱ्यापूर्वी 6 जिल्ह्यांत नेत्यांवर सोपवली जबाबदारी
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाबरोबरच शिंदे गटानंही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, लवकरच दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (६ सप्टेंबर) शिंदे गटाकडून नागपूर शहरासह सहा जिल्ह्यांत विविध पदावर नियुक्त्या करण्यात […]
ADVERTISEMENT
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाबरोबरच शिंदे गटानंही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, लवकरच दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (६ सप्टेंबर) शिंदे गटाकडून नागपूर शहरासह सहा जिल्ह्यांत विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार
शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आणि पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांनी पत्रकार परिषद घेऊन नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे विदर्भाचा दौरा करणार असल्याची माहिती दिली.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये पूर्व विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन मेळावे आयोजित केले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार असून, आगामी सर्व निवडणुकीत भाजप-शिवसेना विजयी होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिंदे गटाकडून देण्यात आली.
एकनाथ शिंदे विदर्भात उद्धव ठाकरेंना देणार धक्का?
मुंबई, ठाणे, पुण्यासह मराठवाड्यातही शिवसेनेतील अनेक आमदार, जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाले आहेत. मराठवाडा दौऱ्यातही अनेक नेत्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं. त्यामुळे शिंदेंच्या विदर्भ दौऱ्यादरम्यानही शिवसेनेतून शिंदे गटात इनकमिंग होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्यात नियुक्त्या केल्या?
शिंदे गटाकडून त्याचीच शिवसेना खरी असल्याचा दावा वारंवार केला जातोय. शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड केलेली असून, आता शिंदेंनी विदर्भात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नागपूर शहर, नागपूर जिल्हा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात शिंदे गटाकडून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी कुणाच्या नियुक्त्या केल्या?
शिंदे गटाचे किरण पांडव यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात जिल्हाप्रमुख पदासह तालुकाप्रमुख पदीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नागपूर लोकसभा : मंगेश काशीकर (संपर्कप्रमुख), सुरज गोजे (महानगर प्रमुख, पश्चिम, मध्य व उत्तर नागपूर)
नागपूर जिल्हा : संदीप ईटकेलवार (जिल्हाप्रमुख), पुरुषोत्तम घोटे (उपजिल्हाप्रमुख, काटोल विधानसभा मतदारसंघ), अजय बालपांडे (तालुकाप्रमुख, नरखेड), मिलिंद देशमुख (जिल्हा संघटक, नागपूर ग्रामीण), रितेश हेलोंडे (संघटक, काटोल विधानसभा मतदारसंघ)
चंद्रपूर जिल्हा : बंडूभाऊ हजारे (सहसंपर्कप्रमुख), नितीन मते (जिल्हाप्रमुख)
गडचिरोली जिल्हा : संदीप बरडे (संपर्कप्रमुख), हेमंत जंभेवार (सहसंपर्कप्रमुख), पौर्णिमा इस्टाम (महिला संघटिका), राजगोपाल सुलावार (जिल्हा संघटक), पप्पी पठाण (तालुकाप्रमुख, चामेर्शी), गौरव बाला (तालुकाप्रमुख, मुलचेरा)
भंडारा जिल्हा : अनिल गायधने (जिल्हाप्रमुख)
गोंदिया जिल्हा : मुकेश शिवहरे (जिल्हाप्रमुख), सुरेंद्र नायडू (जिल्हाप्रमुख)
वर्धा जिल्हा : गणेश ईखार (जिल्हाप्रमुख), संदिप इंगळे (जिल्हा संघटक), राजेश सराफ (सह-संपर्कप्रमुख)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT