आझम खान आणि ‘त्या’ मुलीचा संबंध काय…, आयकर धाडीमुळे का आलीय चर्चेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ekta kaushik azam khan close aide came into limelight after income tax raid ghaziabad uttar pradesh
ekta kaushik azam khan close aide came into limelight after income tax raid ghaziabad uttar pradesh
social share
google news

Ekta Kaushik: दिल्लीला लागून असलेल्या आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Uttar Pradesh Ghaziabad) राहणारी एकता कौशिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिच्यावर आता आयकर विभागाने (Income Tax Department) तिच्यावर थेट कारवाई केली आहे. एकताने बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या मोठ्या ब्रँडच्या कार खरेदी केल्याची माहिती आयकरला मिळाल्यानंत तिच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे. एकताच्या घरावर आयकरची धाड पडल्यानंतर ती चर्चेत आली असली तरी याआधीही ती समाजवादीचे नेते आझम खान (azam khan) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव (former cm Akhilesh Yadav) यांच्याबरोबर ती एकाच फोटोत एकत्र दिसली होती. त्यावेळीही तिची जोरदार चर्चा झाली होती. (ekta kaushik azam khans close aide came into limelight after income tax raid ghaziabad uttar pradesh)

ADVERTISEMENT

बांधकाम क्षेत्रात दबदबा

एकता कौशिक ही गाझियाबाद विकास प्राधिकरणमधून निवृत्त झालेले सुरेंद्र कौशिक यांची ती मुलगी आहे. तर त्याच वेळी, एकताचे सासरे परितोष शर्मा हे देखील यापूर्वी जीडीएमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. मात्र, 2009 मध्ये त्यांनी नोकरीतून व्हीआरएस घेऊन बांधकाम क्षेत्रात आपला जम बसविला आणि त्यांचे काँग्रेसबरोबर चांगले संबंध निर्माण झाले.

राजकीय प्रभाव

गाझियाबादची असलेली एकता कौशिक ही यूपीचे माजी मंत्री आझम खान यांच्या कुटुंबीया जवळची मानली जाते. आझम यांचा धाकटा मुलगा अदीब खान आणि त्याची सून सिद्रा अदीब यांच्याबरोबरही एकताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर आझम खान एकता कौशिकला आपली दत्तक मुलगी मानत असल्याचीही चर्चा होती. आणि यामुळेच एकतासह तिच्या सासरच्या मंडळींचा राजकीय प्रभाव तिथे जाणवत होता.

हे वाचलं का?

जौहर विद्यापीठाची जबाबदारी

एकता कौशिक आणि आझम खान यांचा मुलगा अदीबने नोएडा फिल्मसिटीमधील एका संस्थेतून शिक्षण घेतले होते. एकताने ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स तर अदीबने मॉडेलिंगचे शिक्षण घेतले. अदीबसोबतच्या मैत्रीमुळे एकता आझम खानच्या संपर्कात आली आणि हळूहळू या संपर्काचे रुपांतर जवळीकामध्ये झाले. आझम खान यांनी जौहर विद्यापीठाची जबाबदारी एकता कौशिक यांच्याकडे सोपवली.

आयकरची छापेमारी

तर त्यानंतर याच विद्यापीठाच्या एका विश्वस्ताच्या घरावर आयकरने छापा टाकला होता. त्यानंतर एकता कौशिकच्याही घरावर छापा टाकण्यात आला.तर सध्या एकता कपूरने बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या महागड्या कार घेतल्याची चर्चा होती. याच महागड्या कारची माहिती मिळाल्यानंतरच आयकरने तिच्या घरावर धाड टाकली आहे.

ADVERTISEMENT

सुख-दुःखात एकमेकांसोबत

माजी मंत्री आझम खान एकता कौशिकला आपली दत्तक मुलगी मानतात. त्यामुळेच ते एकताच्या सर्व सुखदुःखात सहभागी होतात. स्वतःच्या मुलीही सेवा करणार नाहीत अशी सेवा माझ्या पत्नीची एकताने केली होती असंही त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना सांगतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT