एलॉन मस्क यांच्या वडीलांचे 35 वर्षीय सावत्र मुलीसोबत प्रेमसंबंध; दोन मुलांना दिला जन्म
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या सावत्र मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या प्रेमसंबंधातून त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे. 76 वर्षीय एरोल मस्क यांचे 35 वर्षीय सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउटसोबत अफेअर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी इरोल आणि जना यांच्या मुलाची माहिती […]
ADVERTISEMENT
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या सावत्र मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या प्रेमसंबंधातून त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे. 76 वर्षीय एरोल मस्क यांचे 35 वर्षीय सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउटसोबत अफेअर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी इरोल आणि जना यांच्या मुलाची माहिती समोर आली होती.
ADVERTISEMENT
51 वर्षीय इलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांनी आता म्हटले आहे की, 3 वर्षांपूर्वी त्यांना जनाकडून मुलगी झाली होती. हे मूल अनियोजित असल्याचं एरोल मस्क यांनी म्हटलं आहे. ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत इलॉन मस्क यांचे वडील एरॉल यांनी सांगितले की, 2019 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला होता. दोन्ही मुले सध्या बेझुईडनहाऊट यांच्यासोबत राहत आहेत. एरोल म्हणाले की आता ते जनासोबत राहत नाही. जनासोबतचे त्यांचे पहिले अपत्य 5 वर्षांचे आहे. आता इलॉन मस्क यांच्या मुलासह एरोल यांच्या मुलांची संख्या 7 झाली आहे.
बेझुइडेनहाउट ही एरोल मस्क यांची दुसरी पत्नी हेड बेझुइडनहॉटची मुलगी आहे. इलॉन मस्कची आई माये मस्कपासून 1979 मध्ये विभक्त झाल्यानंतर त्यांनी हेड बेझुइडेनहाऊट यांच्याशी लग्न केले होते. माये मस्क आणि एरोल मस्क यांना तीन मुले आहेत – अॅलन, किंबल आणि टोस्का.
हे वाचलं का?
Jana Bezuidenhout या Erol Musk यांच्यापेक्षा 41 वर्षांनी लहान आहेत. जेव्हा कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कळले तेव्हा लोकांना धक्काच बसला. एरोल मस्क यांनी सांगितले की, आजही त्यांच्या अनेक मुली त्यांच्या नात्याबद्दल नाराज आहेत. मुलाखतीत इरोल मस्क म्हणाले- ‘मी तिच्या मुलांचा डीएनए तपासलेला नाही. पण ते हुबेहुब माझ्या इतर मुलींसारखी दिसते. एरोल म्हणाले- ‘आपण पृथ्वीवर फक्त प्रजनन करण्यासाठी राहत आहोत.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT