भाषण देताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडला, पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडल्याचा व्हीडिओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लाटेचाही उल्लेख केला. तसंच इतर अनेक मुद्देही उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग भाषण करत असतात, त्यांच्या भाषणाची तारीफही होत असते. मात्र यावेळी त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ आहे ते बोलत असताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते आणि अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले. काय बोलायचं ते त्यांना सुचेना त्यामुळे ते स्क्रिनच्या उजवीकडेही पाहू लागले. गडबड उडालेल्या मोदींनी कानात हेडफोन लावून आपलं भाषण ऐकू येतं आहे का हे विचारून वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगलेच गोंधळलेले दिसले. हेच सगळं असलेला साधारण मिनिटभराचा व्हीडिओ ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नाही अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या क्लिपची खिल्ली उडवली आहे. इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या विरोधात ट्विट केलं आहे. तर काँग्रेसनेही ट्विट करत हमे तो टेलिप्रॉम्प्टरने लुटा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये जोरदार भाषण केलं होतं. वाराणसीमधून भाषण करताना त्यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते उत्तर भारताच्या इतिहासाचा काशीशी असलेला संबंध सांगत अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या होत्या. यावेळी त्यांच्या भाषणानंतर काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर टेलिप्रॉम्पटर असल्याचं दिसतंय. विरोधकांनी त्यांच्या या टेलिप्रॉम्टरवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा काल नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय दावोस समिटला संबोधित करताना बोलताना अडखळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. विरोधकांनी हा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टेलिप्रॉम्पटरने साथ न दिल्याने ही वेळ आल्याचा अनेकांच्या टीकेचा रोख होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT