बीड : १० वी चा इंग्रजीचा पेपर फुटला, झेरॉक्सच्या दुकानावर २० रुपयांना मिळत होता पेपर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कॉपी आणि पेपरफुटीचे प्रकार थांबावेत यासाठी राज्य शिक्षण मंडळ प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहे. परंतू एवढं असूनही पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. बीडच्या साक्षाळपिंप्री गावात दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

साक्षाळपिंप्री गावातील एका झेरॉक्सच्या दुकानात इंग्रजीचा पेपर २० रुपयांत विकला जात होता. सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापेमारी केली असता त्यांना हा धक्कादायक प्रकार कळून आला. या प्रकारामुळे शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

मुलांनो वेळेचं गणित पाळा ! परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचल्यास प्रवेश मिळणार नाही

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१५ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून १९ मार्चरोजी इंग्रजीचा पेपर होता. यादरम्यान बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना, संजय मुरलीधर पालवे यांच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केल्या जात होत्या. यादरम्यान कुमावत यांच्या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यावेळी प्रश्न क्र. ३ व ४ च्या झेरॉक्स प्रती २० रुपयांना एक याप्रमाणे विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

यादरम्यान पोलिसांनी झेरॉक्स चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे मिळून आलेल्या २ प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येकी ८० प्रती आणि झेरॉक्स मशिनही पोलिसांनी जप्त केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT