नागपुरातल्या आकाशात वायुदलाच्या चित्तथरारक कसरती, एअर शोने फेडलं डोळ्याचं पारणं
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टरची चमूने केलेल्या हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची पर्वणी यानिमित्ताने मिळाली. कोव्हिडनंतर दोन वर्षांनी पार पडला एअर शो कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो झाला. वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी […]
ADVERTISEMENT

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टरची चमूने केलेल्या हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची पर्वणी यानिमित्ताने मिळाली.
कोव्हिडनंतर दोन वर्षांनी पार पडला एअर शो
कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो झाला. वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता आला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, अॅवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश होता. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूच्या घरांच्या छतांवर गर्दी केली होती.
एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले.