कायदे पंडित ते उपराष्ट्रपती; नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा आजपर्यंत प्रवास…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाला आज नवा उपराष्ट्रपती मिळाला आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले आणि आजच्याच दिवशी मतमोजणी झाली. यावेळी संपुर्ण 725 मते पडली, त्यापैकी 528 मतं एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांना आणि 182 मतं विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मिळाली, तर 15 मते अवैध ठरली. आकडेवारीचा विचार करता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकही एकतर्फी वाटत होती. 71 वर्षीय धनकड यांचा विजय सुरुवातीपासूनच पक्का वाटत होता. ते राजस्थानच्या प्रभावशाली जाट समाजाचे आहेत आणि राजस्थानमधील जाट समाजाला आरक्षण देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

ADVERTISEMENT

18 मे 1951 रोजी राजस्थानच्या झुंझुनूच्या कैथना गावात जन्मलेल्या जगदीप धनकड देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोकलचंद आणि आईचे नाव केसरी देवी आहे. जगदीप त्याच्या चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. त्यानंतर सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी राजस्थानच्या प्रतिष्ठित महाराज कॉलेज, जयपूरमधून पदवी पूर्ण केली आणि भौतिकशास्त्रात बीएसई पदवी मिळवली. त्यानंतर 1978 मध्ये जयपूर विद्यापीठात एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

धनकड हे देशातील नामवंत वकिलांपैकी एक

जगदीप धनकड यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर वकिली सुरू केली आणि 1990 मध्ये त्यांना राजस्थानच्या उच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल म्हणून घेण्यात आले. धनकड यांनी सर्वोच्च न्यायालयापासून ते देशातील अनेक उच्च न्यायालयांपर्यंत कायद्याचा सराव केला आहे. 1988 पर्यंत ते देशातील नामवंत वकिलांपैकी एक बनले होते.

हे वाचलं का?

1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले

धनकड यांची राजकीय कारकीर्द सुमारे 30 वर्षांची आहे. 1989 मध्ये ते सक्रिय राजकारणात आले आणि त्याच वर्षी जनता दलाच्या तिकिटावर झुंझुनू येथून निवडणूक जिंकून 9व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले. 1990 मध्ये त्यांनी चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही काम केले आहे. यानंतर त्यांनी राजस्थानच्या राजकारणातही नशिब आजमावले. 1993 ते 1998 या काळात ते आमदारही होते.

2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

20 जुलै 2019 रोजी केंद्र सरकारने धनकड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचा कायम ’36 चा आकडा’ राहिला आहे. त्यांच्यात आणि ममता बॅनर्जी यांच्यात उघड मतभेद होते. पश्चिम बंगाल सरकारने जगदीप धनकड यांना राज्यातील खाजगी विद्यापीठांमध्ये ‘अतिथी’ किंवा ‘अभ्यागत’ म्हणून काढून टाकण्यासाठी कायद्यात सुधारणा करून राज्यपालपदावरून हटवले होते.

ADVERTISEMENT

भाजपने एनडीएचे उमेदवार त्यांची निवड का केली?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, आगामी विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने जगदीप धनकड यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते. आपला पक्ष शेतकरी समर्थक असल्याचा संदेश शेतकऱ्यांना देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय जाट फॅक्टर लक्षात घेऊन पक्षाने धनकड यांची निवड केली. कारण, राजस्थान आणि हरियाणा विधानसभा निवडणुका 2023 आणि 2024 मध्ये होणार आहेत, जिथे जाट मतदारांची संख्या जास्त आहे. ज्याद्वारे भाजप जाट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT