नागपूर ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखाची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्ष विरोधी कारवाईचा ठपका
योगेश पांडे, नागपूर, प्रतिनिधी नागपूर: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून ४० आमदारांना आपल्या सोबत घेत बंड केले. त्यानंतर राज्यात राजकीय खळबळ माजली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांनी मिळून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अनेक मुळ शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातून […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, नागपूर, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
नागपूर: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून ४० आमदारांना आपल्या सोबत घेत बंड केले. त्यानंतर राज्यात राजकीय खळबळ माजली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांनी मिळून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अनेक मुळ शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.
ठाणे, नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक, माजी नगरसेवक, माजी आमदार, खासदार शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्यावर कठोर पावलं उचलत त्यांची पक्षातून हकालपट्टी करत आहेत. असाच प्रकार घडलाय नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत.
हे वाचलं का?
संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी करण्यात आली आहे. इटकेलवार नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख होते. शिंदे गटात सामील झाल्यामुळे तसेच पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. संदीप इटकेलवार यांची काही महिन्यांपूर्वी नागपूर सुधार प्रन्यास (NIT) वर विश्वस्त म्हणून महाविकास आघाडी सरकारद्वारा (Mahavikas Aaghadi) नियुक्ती करण्यात आली होती.
शिवसेनेतल्या बंडानंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?, काय म्हणाले राज?
ADVERTISEMENT
दरम्यान शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना आपला नेता मानलं आहे. मग त्यामध्ये रामदास कदम, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. एकाबाजूला उद्धव ठाकरे नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यांची त्याच पदावर नियुक्ती करत आहेत, यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. शिवसेना नक्की कोणाची? याचा निकाल आता सुप्रिम कोर्ट देणार आहे, त्याचबरोबर आता निवडणूक आयोगाच्या दारात देखील ही लढाई गेलेली आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर पक्ष नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी लोकांमध्ये जात आहेत. आदित्य ठाकरेंनी सध्या शिव संवाद यात्रा काढलेली आहे. महाराष्ट्र पिंजून काढायचं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ठरवलेले आहे. एकाबाजूला एकनाथ शिंदे आणि सोबत असलेले ४० आमदार शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहेत तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले साथीदार शिवसेना बाळासाहेबांची आहे, आणि उद्धव ठाकरेच चालवणार असे म्हणत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT