SACHIN VAZE: ‘सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत’, राऊत असं का म्हणाले?
मुंबई: ‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्या ढवळ्याने विरोधी पक्षाने काय मिळवले याचे उत्तर गमावलेला आत्मविश्वास असेच द्यावे लागेल. त्यामुळे सरकारसाठी हा शुभसंकेत नाही.’ असं मत शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं आढळल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्या ढवळ्याने विरोधी पक्षाने काय मिळवले याचे उत्तर गमावलेला आत्मविश्वास असेच द्यावे लागेल. त्यामुळे सरकारसाठी हा शुभसंकेत नाही.’ असं मत शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं आढळल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली त्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका केल्या जात आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सचिन वाझे मनसुख हिरेन प्रकरणी अंबांनीच्या ढाली आडून काय सुरू आहे? असा सवाल करण्यात आला आहे.
अंबानींच्या घराबाहेर आढळलेली गाडी हा कट असेल तर अंबानी कुटुंबास ठार करण्याचा कट ‘जैश-उल-हिंद’ने का रचावा? २१ जिलेटिनच्या कांड्या व एक स्कॉर्पिओ हा अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे, असं म्हणतं आजच्या सामनातून या प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?