मुलगी झाली हो! कुटुंबाने केलं जंगी स्वागत, चक्क हेलिकॉप्टरनं आणलं घरी
–स्मिता शिंदे, पुणे भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझं अशीच चुकीची समजूत कायम असल्याचं उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून समोर येतं. तर दुसरीकडे याच जुन्या विचारांना तिलांजली देत मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत केल्याचीही उदाहरण बघायला मिळातात. मुलीच्या जन्माच्या जंगी स्वागताची अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडलीये. मुलगी जन्माला आली […]
ADVERTISEMENT

–स्मिता शिंदे, पुणे
भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझं अशीच चुकीची समजूत कायम असल्याचं उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून समोर येतं. तर दुसरीकडे याच जुन्या विचारांना तिलांजली देत मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत केल्याचीही उदाहरण बघायला मिळातात. मुलीच्या जन्माच्या जंगी स्वागताची अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडलीये. मुलगी जन्माला आली म्हणून कुटुंबाने चक्क हेलिकॉप्टरमधून तिला घरी आणलं.
अलिकडच्या काळात अनेकांकडून मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. असाच एका मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात चर्चिला जात आहे. तालुक्यातील शेल पिंपळगांव येथील एका कुटुंबाने आपल्या नवजात मुलीला चक्कं हेलिकॉप्टरने घरी आणले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.











