इंदापूर : महावितरणच्या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांचा मोर्चा, पोलिसांसोबत बाचाबाची
विज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावलाय त्या विरोधात आज पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात बावडा कळस आणि भवानीनगर येथे आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला. भवानीनगर येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता बारामतीत अजित पवार यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतू या आंदोलकांना पोलिसांनी काटेवाडीत […]
ADVERTISEMENT
विज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावलाय त्या विरोधात आज पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात बावडा कळस आणि भवानीनगर येथे आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला. भवानीनगर येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता बारामतीत अजित पवार यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतू या आंदोलकांना पोलिसांनी काटेवाडीत ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे रास्तारोको करणारे शेतकरी पोलीस यांच्यात धरपकड झाल्यानंतर इंदापुरातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पायी चालत बारामतीत पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाविरुद्ध विजबीलांची होळी करुन आपला निषेध नोंदवला होता.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी विज खंडित केल्यामुळे आंदोलन करत निषेध नोंदवल्यानंतर ते आंदोलक इंदापूर – बारामती राज्य महामार्गावरती रास्ता रोको करण्यासाठी सरसावले. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरती बसण्यासाठी मज्जाव केला. यातून पोलिस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT