डेक्कन एक्सप्रेससमोर 6 वर्षांच्या मुलासह वडिलांनी मारली उडी, सीसीटीव्हीत घटना कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा या अपघातातून सुखरूप बचावला आहे. प्रमोद आंधळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रमोद आंधळे बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते.

ADVERTISEMENT

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराजसह संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले होते. विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर प्रमोद यांनी मुलासह उडी मारली. प्रमोद यांनी रेल्वेखाली उडी मारताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावला.

‘पप्पा तुमच्यामुळे कोणीही…’ 11व्या मजल्यावरून उडी मारुन फॅशन डिझायनरची आत्महत्या

हे वाचलं का?

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वराजला बाहेर काढले, तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात प्रमोद आंधळे आपली पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. प्रमोद बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .

‘आत्महत्या करते आहे, शेवटचं पाहून घ्या’ वडिलांना फोन करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी

ADVERTISEMENT

प्रमोद आंधळे यांनी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते नोकरीला असताना आपल्या मुलासह त्यांनी रेल्वेखाली उडी मारून का आत्महत्या केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता मुलगा वाचला असून प्रमोद यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जातो आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT