मुलाच्या टीचरसोबत जुळलं कपडा व्यापाऱ्याचं सूत, अनैतिक संबंधाचा गुंता अन् हत्येनं शेवट!
नवी दिल्ली: राजस्थानमधील अलवर येथील महिलेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील एका मोठ्या कापड व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेची हत्या करण्यात आली होती तिचे व्यापाऱ्यासी अनैतिक संबंध होते. ही महिला व्यापाऱ्याच्या मुलाची शिकवणी (Tuition)घेत असे. प्रियंका बहल असे मृत महिलेचे नाव असून ती दिल्लीतील गांधी नगर येथे राहत […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: राजस्थानमधील अलवर येथील महिलेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील एका मोठ्या कापड व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेची हत्या करण्यात आली होती तिचे व्यापाऱ्यासी अनैतिक संबंध होते. ही महिला व्यापाऱ्याच्या मुलाची शिकवणी (Tuition)घेत असे. प्रियंका बहल असे मृत महिलेचे नाव असून ती दिल्लीतील गांधी नगर येथे राहत होती.
ADVERTISEMENT
16 मार्च रोजी अलवरच्या ततारपूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली होती की, इंद्र बस्तीजवळ एका पुलाखाली गोणीत मृतदेह सापडला आहे. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पुलाखाली कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका पांढऱ्या प्लास्टिकमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
वैद्यकीय तपासणीत मृत महिलेचा मृतदेह हा 4 ते 5 दिवस जुना असल्याचे समोर आले. म्हणजेच ही हत्या 4-5 दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. ज्यानंतर महिलेचा मृतदेह पिशवीमध्ये भरुन तो पुलाखाली फेकून देण्यात आला होता.
हे वाचलं का?
दरम्यान, या हत्येचे गूढ उकलण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू केला. बरीच चौकशी केल्यानंतर या महिलेची ओळख पटली. ती 29 वर्षीय प्रियंका बहल, गांधी नगर, दिल्लीची रहिवासी असल्याचं समजताच पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने तपास सुरु केला.
पोलिसांनी माहिती गोळा केली असता, गांधीनगरमधील बँकेतून पैसे काढल्यानंतर प्रियंका घरी परतली नसल्याचे समोर आलं होतं. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, बीटीएस डेटा आणि इतर संसाधनांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कारचा शोध घेतला.
ADVERTISEMENT
दरम्यान, पोलिसांनी हे देखील समजलं की, महिलेची दिल्लीतच हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. यानंतर राजस्थान पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने आनंद बिहार, गांधी नगर, करावल नगर, गाझियाबाद येथे छापे टाकून हत्येतील आरोपी कपिल गुप्ता, सुनैना गुप्ता, राज किशोर आणि सचिन यांना अटक केली.
ADVERTISEMENT
या हत्येबाबत पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली असता, अशी माहिती मिळाली की, मृत महिला प्रियंका ही प्रायव्हेट ट्यूशन घेणारी शिक्षिका होती आणि ती व्यापारी कपिल गुप्ता यांच्या घरी मुलांना शिकवण्यासाठी जात असे. यादरम्यान तिची कपिल गुप्तासोबत जवळीक वाढली आणि त्यांच्यात अनैतिक संबंधही निर्माण झाले.
फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या
यानंतर प्रियांकाने आधीच विवाहित असलेल्या व्यापारी कपिलवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने व्यावसायिकावर दबाव टाकत 50 लाख रुपयांची मागणी केली होती. या सगळ्या प्रकारातून सुटका करुन घेण्यासाठी कपिल गुप्ता याने कुटुंबीय आणि नोकरांसह प्रियांकाच्या हत्येचा कट रचला. प्रियांकाची हत्या केल्यानंतर या सर्वांनी तिचा मृतदेह देखील दूर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला होता. दरम्यान, महिलेचा मृतदेह सापडल्यानेच ही संपूर्ण घटना उघडकीस आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT