मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नेमक्या कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मला कोणत्याही गुन्ह्यांची पर्वा नाही हे जसं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणातून म्हणायाचे अगदी तसंच राज ठाकरेंनीही अनेकदा त्यांच्या भाषणांमधून म्हटलं आहे. असं असलं तरीही राज ठाकरेंनी १ मे रोजी जे भाषण केलं त्यामुळे आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मला कोणत्याही गुन्ह्यांची पर्वा नाही हे जसं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणातून म्हणायाचे अगदी तसंच राज ठाकरेंनीही अनेकदा त्यांच्या भाषणांमधून म्हटलं आहे. असं असलं तरीही राज ठाकरेंनी १ मे रोजी जे भाषण केलं त्यामुळे आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
आपण जाणून घेऊ राज ठाकरेंच्या विरोधात नेमक्या कोणत्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?
हे वाचलं का?
कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातलं पोलीस अधिनियम १३५ हे अटी शर्थींचा भंग करण्यासाठी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला जेव्हा पोलिसांनी संमती दिली त्याचवेळी त्यांनी जर तुम्ही या शर्थी आणि अटी मान्य केल्या नाहीत तर ही नोटीस तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावा म्हणून वापरली जाईल असंही म्हटलं होतं.
इतर कलमांचा अर्थ काय?
ADVERTISEMENT
कलम १५३- दोन समूहांमध्ये भांडण लावणे
ADVERTISEMENT
कलम ११७-गुन्ह्याला मदत करणं, चिथावणीखोर भाषण करणं, वक्तव्य करणं
कलम ११६-गुन्हा करण्यासाठी मदत करणं
IPC कलम १५३ (ब) मधल्या सब-सेक्शन १ मधलं क्लॉज सी
सेक्शन मध्ये १५३ हे देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या गुन्ह्यांबाबत आहे. कलम १५३ नुसार विविध धार्मिक, भाषीय, जातींमध्ये तेढ निर्माण करणं, किंवा ज्याने सार्वजनिक शांती भंग होईल अशी कृती करणं गुन्हा ठरतं. यामध्येही तीन वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. हे गुन्हे अजामीनपात्र असल्याची माहिती मुंबई तकला मुंबई हायकोर्टातील वकील असीम सरोदे यांनी दिली.
महाराष्ट्रात काय किंवा देशात काय दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्यं अनेकदा करण्यात आली आहेत. छगन भुजबळ आधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये आणि मग राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीत राहिले. शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी भुजबळांनी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच टार्गेट केलं. २००० च्या दरम्यान जेव्हा भुजबळ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही होते, तेव्हा मुंबई दंगलीप्रकरणी बाळासाहेब ठाकरेंवर हेच IPC चं कलम 153 लावलेलं. समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करणारं कलम. याप्रकरणात बाळासाहेब ठाकरेंना अटकही झाली, पण लगेच सुटका झाली होती.
याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनसेच्या स्थापनेपासूनच उत्तरभारतीयांविरोधात जो मोर्चा उघडला, जी प्रक्षोभक भाषणं केली, त्याप्रकरणातही राज ठाकरेंवर IPC सेक्शन १५३ लावण्यात आलं होतं. रात्री २ वाजता त्यांना चिपळूणमध्ये अटक करण्यात आली, आणि नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना कल्याण कोर्टाकडून जामीन मंजूर झाला.
२००० मध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीही एक वक्तव्य केलं होतं. मुस्लिम समाजाला जर कुणी त्रास दिला, तर कुणाचीच खैर नाही, असं आझमी मुंबईतल्या नागपाडातल्या सभेत म्हणाले. त्यांचा रोख साहजिकच शिवसेनेवर होता. पण दोन समाजात शत्रुत्व, हिंसा निर्माण करणारं वक्तव्य म्हणून आझमींना माझगाव मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने २०१२ मध्ये २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता राज ठाकरेंवर जी कलमं लावण्यात आली आहेत त्यात कलम १५३ ही आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT