Mumbai: भांडूपमधील सनराईज हॉस्पिटलला भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

मुंबई: मुंबईतील भांडूप येथे ड्रीम मॉलमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे. याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज नावाचं एक हॉस्पिटल आहे. जिथे 70 हून अधिक रुग्ण दाखल होते. यामधील सर्वाधिक रुग्ण हे कोरोना व्हायरसवर उपचार घेणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार ज्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: मुंबईतील भांडूप येथे ड्रीम मॉलमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे. याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज नावाचं एक हॉस्पिटल आहे. जिथे 70 हून अधिक रुग्ण दाखल होते. यामधील सर्वाधिक रुग्ण हे कोरोना व्हायरसवर उपचार घेणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार ज्या 10 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे ते सर्व रुग्ण होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णांना बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल-4 ची आहे. त्यामुळे आगीचं भीषण रुप पाहता अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या अनेक तासांपासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे अथक प्रयत्न करत आहेत. याशिवाय रुग्णालयात कुणी रुग्ण अडकलेला तर नाही ना? याचा देखील शोध घेतला जात आहे.

सीरम इन्स्टिट्युटला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे-अजित पवार