GBS Disease : राज्यात GBS मुळे पहिला मृत्यू? रुग्णांची संख्याही वाढली, धोका वाढला...
प्रशासनाचे अधिकारी पुण्यातील पाण्याचे नमुने घेत आहेत. विशेषतः ज्या भागातून रुग्ण समोर आलेत त्या भागावर लक्ष आहे. या परिस्थितीला हाताळण्याचं मोठं आवाहन सध्या प्रशासनासमोर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

GBS आजारामुळे सोलापुरात पहिला मृत्यू?

पुण्यामध्ये GBS बाधीत रुग्णांची संख्या वाढली

राज्यात GBS चा धोका वाढण्याची शक्यता
GBS diseas in Pune and Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या प्रादुर्भावाशी संबंधित पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या रुग्णाच्या मृत्यूचं कारण GBS असल्याचा संशय आहे. तसंच ताज्या माहितीनुसार राज्यातील रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. 28 नवीन लोकांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असल्यचाचं स्टेफी थेवर यांनी सांगितलं आहे. आरोग्य विभागाच्या हेल्थ बुलेटिनमध्ये असं म्हटलं आहे की, GBS चा संसर्ग झालेल्या मृत्यूचं प्रकरण सोलापूरमध्येही समोर आलं आहे, मात्र याबद्दलची सविस्तर माहिती अजून समोर येऊ शकलेली नाही.
GBS या आजाराचं निदान झालेले सोळा रुग्ण सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. लक्षणं असलेल्यांपैकी जवळपास 19 रुग्ण नऊ वर्षांपेक्षा कमी आहेत. तर 50 ते 80 वयोगटातील 23 रुग्ण आहेत. GBS आजार हा अत्यंत दुर्मिळ आहे, पण त्यावर उपचाराही शक्य आहे.
हे ही वाचा >> Thane Crime News : 55 वर्षीय कामगाराकडून 9 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, 7 महिन्यानंतर कारवाई, प्रकरण काय?
9 जानेवारी रोजी पुण्यात पहिला GBS बाधीत रुग्ण नोंदवला गेला. रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आला आहे. GBS च्या जगभरातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जवळपास एक तृतीयांश प्रकरणं ही सी-जेजुनी या बॅक्टेरियामुळे होतात आणि याकडे गंभीर संसर्गासाठीचं कारण म्हणून पाहिलं जातं.
प्रशासनाचे अधिकारी पुण्यातील पाण्याचे नमुने घेत आहेत. विशेषतः ज्या भागातून रुग्ण समोर आलेत त्या भागावर लक्ष आहे. शनिवारी जाहीर झालेल्या चाचणीच्या निकालांमध्ये असे दिसून आलं की, पुण्यातील मुख्य जलसाठा असलेल्या खडकवासला धरणाजवळील एका विहिरीत ई. कोलाय या जीवाणूचे प्रमाण जास्त होतं. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातोय की नाही हे स्पष्ट नाही. तरीही स्थानिक रहिवाशांना पाणी उकळून आणि अन्न गरम करून खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.