Ganesh Utsav 2022 : बाप्पा मोरया रे! लालबागच्या राजाची पहिली झलक
यंदा कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदा गणेश उत्सव साजरा होतो आहे. मूर्तीच्या उंचीची बंधनं किंवा कुठल्याही मर्यादा यावेळी नाहीत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. अशात लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने बाप्पाची पहिली झलक समोर आणली आहे. Ganesh Chaturthi 2022 : गणेश उत्सव […]
ADVERTISEMENT
यंदा कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदा गणेश उत्सव साजरा होतो आहे. मूर्तीच्या उंचीची बंधनं किंवा कुठल्याही मर्यादा यावेळी नाहीत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. अशात लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने बाप्पाची पहिली झलक समोर आणली आहे.
ADVERTISEMENT
Ganesh Chaturthi 2022 : गणेश उत्सव कधी सुरू होणार? कशी करायची बाप्पाची स्थापना?
लालबागचा राजाची पहिली झलक
लालबागचा राजा गणपतीची पहिली झलक खुली करण्यात आली आहे. सिंहासनावर बसलेल्या रूपात गणपती बाप्पा दिसतो आहे. त्याच्या एका हातात गदा आहे. एका हातात चक्र आहे. आशीर्वादाचा हातही ऱेखीव आहे. तसंच एका हातात मोदक आहे. वर्षानुवर्षे लालबागच्या राजाची ही अशीच मूर्ती घडवली जाते. यावेळी अयोध्येतील राम मंदिराचा सेट लालबाग या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यामध्ये बाप्पा विराजमान होणार आहे.
हे वाचलं का?
लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सज्ज झाले होते. अशात लालबागच्या राजाची पहिली झलक काही वेळापूर्वीच दाखवण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्टला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. लालबागचा राजा हा मुंबईतला नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
ADVERTISEMENT
काय आहे लालबागच्या राजाचा इतिहास?
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे
ADVERTISEMENT
१९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री’ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली. कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. तेव्हापासून लालबागचा राजा मुंबईत बसवला जातो आहे. आजच या राजाची झलक दाखवण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT