Bihar Chief Minister: भाजपला आता JDU ची गरज लागणार नाही, बनवू शकतात स्वत:चाही मुख्यमंत्री... नेमकं गणित समजून घ्या!
बिहार विधानसभा निवडणुकीत NDA चा प्रचंड मोठा विजय झाला. पण ज्यामध्ये JDU ने अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पण असं असलं तरी यापुढे भाजप JDU शिवाय देखील स्वत:चं सरकार स्थापन करू शकतं. नेमकं कसं त्याबाबतचं गणित समजून घ्या.
ADVERTISEMENT

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (14 नोव्हेंबर) जाहीर झाले असून त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने प्रचंड बहुमत मिळवले आहे. एनडीएने 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) JDU ला 84 जागा मिळाल्या आहेत. मात्र, या निकालात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे एवढ्या जागा मिळवून देखील नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष (BJP)ला तब्बल 90 जागांवर विजय मिळाला असून ते जेडीयूशिवाय देखील इतर मित्रपक्षांच्या मदतीने स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकतता. याच सगळ्या समीकरणाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
बिहारमध्ये भाजप नितेश कुमार यांच्या मदतीशिवाय देखील आता त्यांचं सरकार स्थापन करू शकतं. याबाबत विश्लेषकांच्या मत आहे की, हे शक्य होईल, पण ते धोकादायक आणि अस्थिर असू शकते.
हे ही वाचा>> भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर बनली आमदार, दिग्गज नेत्याला चारली धूळ
बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत आणि बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. सध्या भाजप 90 जागा (आघाडी/विजयी) आहेत. तर जेडीयू 84 जागांवर विजयी झाले आहेत. याशिवाय लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) - एलजेपी(आरव्ही) यांना 21 जागा आहेत. तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) - एचएएम(एस) 4 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा - आरएलएम ४ जागा आणि एनडीएमधील इतर छोटे पक्ष मिळून सुमारे 7-9 जागा आहेत,
एनडीएचे एकंदर आकडे 200 च्या पुढे पोहोचले आहेत, जे 2020 च्या तुलनेत मोठी वाढ दर्शवते. त्यावेळी NDA ला 125 जागा मिळाल्या होत्या पण आता तब्बल 75 हून अधिक जागा वाढल्या आहेत. दुसरीकडे विरोधात असलेल्या आरजेडी, काँग्रेस यांना केवळ 34 जागांपर्यंत मर्यादित ठेवण्यात भाजपला यश आलं आहे.










