मोठी बातमी : मुंबईच्या CSMT स्थानकाबाहेर संशयास्पद लाल बॅग, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Mumbai CSMT station Suspicious red bag : मोठी बातमी : मुंबईच्या CSMT स्थानकाबाहेर संशयास्पद लाल बॅग, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
ADVERTISEMENT

Mumbai CSMT station Suspicious red bag : मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. लाल रंगाची बॅग ठेऊन कोणीतरी निघून गेल्याचं समोर आलंय. दरम्यान, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असून बॅगेत संशयित आहे का? हे तपासलं जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार ब्लास्टमध्ये दहशतवादी कृत्य असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबईत देखील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. संबंधित बॅगेत काय आहे? याची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, संशयास्पद बॅग आढळ्यानंतर पोलिसांनी बस डेपोचा परिसर बंद करून तपास सुरू केला. सीएसएमटी स्थानकाजवळ सापडलेल्या त्या पिशवीत काहीही संशयास्पद आढळले नाही; त्यात फक्त कपडे असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा : बिहार विधानसभा निवडणुकीबाबत सट्टा बाजारात भलताच अंदाज, भाजपच्या अडचणी वाढणार.. गेम फिरणार?










