हुंडा म्हणून हवी होती म्हैस, नंतर सासऱ्याने सुनेसोबत नको ते केलं, पण आता...
Crime News : सासरच्यांनी हुंड्यात म्हैस न दिल्याच्या कारणावरून सूनेची हत्या केल्याची माणसुकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रथम बलजिंदर पाल यांच्या न्यायालयाने हुंडाबळी प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'त्या' कारणावरून सोनीची गळा दाबून हत्या
पतीला 15 तर सासऱ्याला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
Crime News : सासरच्यांनी हुंड्यात म्हैस न दिल्याच्या कारणावरून सुनेची हत्या केल्याची माणसुकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रथम बलजिंदर पाल यांच्या न्यायालयाने हुंडाबळी प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात आता दोन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये दुर्गावती पोलीस ठाणे परिसरातील अकोधी मेळा येथील रहिवासी विकेश कुमार आणि त्याचे वडील हरिचरण सिंग यांचा यात समावेश आहे. हुंड्यात म्हैस न दिल्याने त्यांच्या सुनेचा गळा दाबून हत्या केली. या प्रकरणात पतीला 15 आणि सासऱ्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना बिहारमधील भाबुआ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पोटच्या लेकराला आईने जळत्या चुलीत फेकलं, नंतर साडीने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणाले, तिचा पती...
'त्या' कारणावरून सोनीची गळा दाबून हत्या
त्यांनी सांगितलं की, कैमुर जिल्ह्यातील चांद पोलीस ठाणे परिसरातील शिव गावातील रहिवासी असलेले राजेंद्र सिंह यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार, 2023 मध्ये त्यांची मुलगी सोनीचा विवाह विकेश कुमारशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. सोनीचा पती आणि सासरे हुंडा म्हणून म्हशीची मागणी करत असल्याचा आरोप खटल्यात नमूद करण्यात आला. त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने 8 मार्च 2024 मध्ये सोनीचा गळा दाबून हत्या करण्यात आली.
पतीला 15 तर सासऱ्याला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
त्यांनी सांगितलं की, तपासकर्त्यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, सासूचा खटला अजूनही प्रलंबित आहे, तसेच न्यायालयाने पती विकास कुमारला दोषी ठरवले आणि त्याला 15 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे, तर सासरा हरिचरण सिंग यांना 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सिंह, झेब्रा पाहता येणार, पण एवढं तिकीट महागणार, कारण...
तसेच आता न्यायालयाने आरोपीला पीडितेला भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयाने जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाला मृत मुलगी जागृतीला योग्य ती भरपाई आणि काळजी देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली.










