भावी नगरसेवकांच्या घरपट्टी भरण्यास रांगा, महाराष्ट्रातील 'या' नगरपरिषदेत 8 दिवसात 40 लाखांचा कर जमा

मुंबई तक

Maharashtra Nagarparishad Election : भावी नगरसेवकांच्या घरपट्टी भरण्यास रांगा, महाराष्ट्रातील 'या' नगरपरिषदेत 8 दिवसात 40 लाखांचा कर जमा

ADVERTISEMENT

Maharashtra Nagarparishad Election
Maharashtra Nagarparishad Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भावी नगरसेवकांच्या घरपट्टी भरण्यास रांगा

point

महाराष्ट्रातील 'या' नगरपरिषदेत 8 दिवसात 40 लाखांचा कर जमा

Barshi municipal council : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर बार्शी नगरपरिषदेच्या महसुलात वाढ झाली असून, घरपट्टी विभागात तब्बल 40 लाखांची वसुली झाली आहे. बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दिनांक 4 नोव्हेंबर पासून ते दि. 12 नोव्हेंबर अखेरीस घरपट्टी विभागात सुमारे 40 लाख रुपयांची कर वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.

बार्शी नगरपालिकेत 8 दिवसांत 40 लाखांची घरपट्टी जमा 

बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी थकबाकीची रक्कम पूर्णपणे जमा केली आहे. कारण उमेदवारांसाठी कर थकबाकी नसणे ही अत्यावश्यक अट असल्याने, निवडणुकीपूर्वी घरपट्टी विभागात वसुलीचा ओघ वाढलेला दिसतो. दरम्यान, महसुली आकडेवारीत वाढ होत असतानाच, शहरात उमेदवारी निश्चितीसाठी नेत्यांकडून अंतिम हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.

हेही वाचा : महिलेच्या पापण्यांमध्ये 250 जिवंत उवा अन् त्यांनी अंडीही घातली; डॉक्टरांकडून मोठी शस्त्रक्रिया, पण आजार कोणता?

महायुती आणि महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर 

बार्शी नगरपालिका ही राज्यातील अ वर्ग नगरपालिकांपैकी एक असून 42 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे गट मैदानात उतरले आहेत. आमदार दिलीप सोपल यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पत्नी निर्मला बारबोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून माजी नगरसेवक प्रशांत कथले यांच्या पत्नी तेजस्विनी प्रशांत कथले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दोन्ही उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात.

हे वाचलं का?

    follow whatsapp