माजी मंत्र्यांच्या घरी तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (३६) असे मृत शिपायाचं नाव आहे. नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेशची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर […]
ADVERTISEMENT

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (३६) असे मृत शिपायाचं नाव आहे.
नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेशची ड्युटी लावण्यात आली होती.
ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नीतेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून, पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता.