माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना ED चा दणका, कोट्यवधींची संपत्ती जप्त
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोट्यवधी रूपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग अर्थात पैशांच्या गैरव्यवहारांपैकी ही कारवाई ईडीने केली आहे. एक-दोन नाही तब्बल 4.20 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचंही बोललं जातं आहे. ईडीने […]
ADVERTISEMENT
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोट्यवधी रूपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग अर्थात पैशांच्या गैरव्यवहारांपैकी ही कारवाई ईडीने केली आहे. एक-दोन नाही तब्बल 4.20 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचंही बोललं जातं आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रूपये इतकी आहे.
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मार्च महिन्यात एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी त्यावेळी गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला महिन्याला शंभऱ कोटी रूपये वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं. असा उल्लेख होता एवढंच नाही तर पोलिसांच्या बदल्यांमध्येही ते ढवळाढवळ करत होते असाही आरोपही करण्यात आला होता. या पत्राने खळबळ उडाली होती. हे प्रकरण आधी सुप्रीम कोर्टात आणि मग बॉम्बे हायकोर्टात गेलं. बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. ही शंभर कोटींची वसुली बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून वसूल करायची असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं असंही परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर हे सगळं प्रकरण ईडी हाताळते आहे.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. अनिल देशमुख यांची सुमारे 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेले आरोप जाणीवपूर्वक केले आहेत असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. सचिन वाझेचे बॉस परमीबर सिंगच होते त्यामुळे ते त्यांना रिपोर्ट करत होते त्यांनी त्यांचं पद गेल्यानंतर जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप केले आहेत असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांची आता चार कोटींहून जास्त रक्कमेची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
हे वाचलं का?
अनिल देशमुख यांच्या पत्नीला समन्स
Money Laundering प्रकरणी आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती यांची याबाबत चौकशी केली जाणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.चार दिवसांपूर्वी आरती देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT