Vaccination Drive: आजपासून सर्वांसाठी मोफत लस, योग दिनाच्या मुहूर्तावर 18 वर्षावरील सर्वाचं लसीकरण सुरु
मुंबई: Mega Vaccination Drive On Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनापासून (international yoga day)(21 जून) देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकास कोरोनाची लस (Corona Vaccine) मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना जाहीर केलं होतं की, योग दिनापासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस दिली जाईल. […]
ADVERTISEMENT
मुंबई: Mega Vaccination Drive On Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनापासून (international yoga day)(21 जून) देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकास कोरोनाची लस (Corona Vaccine) मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना जाहीर केलं होतं की, योग दिनापासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस दिली जाईल. ज्याची सुरुवात आजपासून होत आहे.
ADVERTISEMENT
21 जूनपासून सरकार 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस विनामूल्य लसीकरण (vaccination) करणार. अशा परिस्थितीत, सोमवारपासून जगातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेला आता सुरुवात होणार आहे.
नवीन लसीकरण धोरणात 18 ते 44 वयोगटातील लोक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस मिळविण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील लोकांना Cowin पोर्टलवर अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. परंतु नवीन धोरणानुसार 18 वर्षे वयोगटातील सर्व लोकांना केंद्र सरकारद्वारे मोफत लस दिली जाणार आहे.
हे वाचलं का?
या महा लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. ज्यामुळे आता राज्यांना काहीही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. पण जे लोकं खासगी रुग्णालयात जाऊन लस घेतील त्यांना मात्र पैसे मोजावे लागणार आहेत.
Free Vaccine: 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार: फडणवीस
ADVERTISEMENT
जाणून घ्या आजपासून सुरु होणाऱ्या महा लसीकरण मोहीमेतील महत्त्वाचे मुद्दे:
ADVERTISEMENT
-
सरकारी रुग्णालयं, लसीकरण केंद्र इथे 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार.
यासाठी आता कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करणं आणि स्लॉट मिळवणं अनिवार्य नाही. त्यामुळे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्याला लस घेता येणार आहे.
खासगी रुग्णालयात जाऊन आपण लस घेऊ शकता. पण त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. जर आपण खासगी रुग्णालयात जाऊन कोव्हिशिल्ड घेतली तर त्यासाठी आपल्या 790 रुपये, कोव्हॅक्सिन लस घेतली तर त्यासाठी 1410 रुपये आणि स्पुटनिक-V लस घेतली तर 1145 रुपये मोजावे लागतील.
Big News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस-पंतप्रधान
दरम्यान, याआधी 18 ते 44 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही राज्य सरकारांकडे सोपविण्यात आली होती. मात्र, तेव्हा लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची ओरड राज्य सरकारांकडून होत होती. त्यामुळे राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाच्या 25 टक्के कामाची जबाबदारी देखील भारत सरकार घेतली आहे.
लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देणार. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात 18 वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील.
लसींच्या उत्पादनांपैकी 75 टक्के लसी केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्या लसी राज्यांना पुरवल्या जातील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT