धक्कादायक! RTPCR नमुन्यांमध्ये बुरशी, आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणा समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये RTPCR चाचण्यांसाठी घेण्यात आलेल्या घशातील स्त्रावाचे नमुने उघड्यावरच पडून असल्यामुळे त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली आहे. वाशिम येथील प्रयोगशाळेत हे नमुने तपासणीसाठी आले असताना हा धक्कादायक प्रकार उघडीकस आला. हे सर्व नमुने प्रयोगशाळेने परत पाठवले आहेत.

अवश्य वाचा – अमरावती विद्यापीठातील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

दोन दिवसांपूर्वी वाशिमच्या प्रयोगशाळेत ३१० नमुने तपासणीसाठी आले होते. ज्यातील ११० नमुन्यांमध्ये बुरशी लागल्याचं प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना दिसून आलं. यामुळे ११० नागरिकांना पुन्हा एकदा आपली कोरोना चाचणी करवून घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झालेली असतानाही आरोग्य विभागाचे कर्मचारी इतका हलगर्जीपणा कसा दाखवू शकतात असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार RTPCR चाचणीतून घेतलेले ३१० नमुने हे २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान घेतले होते. या नमुन्यांनी २४ तासांत तपासणी करणं गरजेचं होतं. परंतू आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी हे नमुने तपासणीला पाठवण्यासाठी उशीर केला ज्यामुळे ते एकाच जागेवर जास्तकाळ पडून होते. ज्यानंतर त्यातील ११० नमुन्यांना बुरशी लागल्याचं दिसून आलं. RTPCR चाचण्यांमधून घेण्यात आलेल्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांना एका विशिष्ठ तापमानात ठेवणं गरजेचं असतं. परंतू हे नमुने आमच्याकडे तपासणीसाठी उशीरा आल्यामुळे हा प्रकार घडला असावा. दरम्यान संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही नोटीस पाठवली असून लवकरच चौकशी करुन कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT