आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ पुन्हा वादात; आमदारासह रहिवाशांची मुंबई हायकोर्टात याचिका
माफिया क्वीन्स गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक असताना वादात सापडला आहे. चित्रपटातील काही बाबींवर कामाठीपुऱ्यातील नागरिकांनी आक्षेप घेतला असून, न्यायालयाकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार अमीन पटेल यांनीही यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी (२३ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि अभिनेत्री आलिया […]
ADVERTISEMENT

माफिया क्वीन्स गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक असताना वादात सापडला आहे. चित्रपटातील काही बाबींवर कामाठीपुऱ्यातील नागरिकांनी आक्षेप घेतला असून, न्यायालयाकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार अमीन पटेल यांनीही यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी (२३ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत असलेला गंगुबाई काठियावाडी चित्रपट शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रोजी प्रदर्शित होत आहे. गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर आता आमदार अमीन पटेल यांच्यासह कामाठीपुऱ्यातील नागरिकांनी याचिका दाखल केली आहे.
“माझ्या आईला वेश्याच बनवून टाकलं”; संजय भन्साळी, हुसैन झैदींविरुद्ध बदनामीचा खटला
चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असल्यानं याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जमादार यांच्या खंठपीठाकडे केली. त्यावर याचिकेवर बुधवारी सुनावणी घेतली जाईल, खंठपीठाने सांगितलं.
‘गंगुबाई काठियावाडी’विरुद्ध याचिका का?
कामाठीपुऱ्यातील रहिवाशी श्रद्धा सुर्वे, आमदार अमीन पटेल यांच्यासह नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेत चित्रपटातील काही बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. गंगुबाई काठियावाडी चित्रपटात कामाठीपुऱ्याचं चित्रण चुकीच्या प्रद्धतीने केलेलं आहे. जर कामाठीपुऱ्याचे नावे चित्रपट प्रदर्शनास परवानगी दिली गेली, तर त्यामुळे स्थानिक रहिवाशांना विशेषतः महिलांचा आदर कमी होऊन हानी होऊ शकते, असं याचिककर्त्यांनी म्हटलं आहे.
Gangubai kathiawadi : पतीने ५०० रुपयांसाठी विकलेली बाई मुंबईची माफिया क्वीन बनली!
चित्रपटात कामाठीपुरा नावाचा संदर्भ घ्यायला नको. त्याऐवजी चित्रपटात नाव बदलून मायापुरी वा मायानगरी असं करावं. कामाठीपुऱ्यात सध्या पाच टक्केही देहविक्री व्यवसाय होत नाही. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून परिसराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. कारण चित्रपटातून संपूर्ण भागालाच रेड लाईट एरिया म्हणून दाखवलं गेलं आहे, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.
या चित्रपटामुळे असा सामाजिक दुष्पपरिणाम होईल की मुलींना वेश्या म्हणून टोमणे मारले जातील. छेडलं जाईल. त्याचबरोबर इथे राहणाऱ्या कुटुंबियांना कमी प्रतिष्ठीत म्हणूनच राहावं लागेल, असा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आला आहे.
अमीन पटेल यांनीही अशाच स्वरूपाचा मुद्दा मांडला आहे. जनहित याचिकेद्वारे आमदार पटेल यांनी न्यायालयासमोर म्हणणं मांडलं आहे. अनेक सेवाभावी संघटना, स्थानिक रहिवाशांकडून या चित्रपटाबद्दल तक्रारी मिळाल्या आहेत. कामाठीपुऱ्यालाच देह विक्रीचं केंद्र दाखवल्यामुळे नागरिकांनी आक्षेप नोंदवला असल्याचं आमदारांनी याचिकेत म्हटलं आहे.