आर्यनसाठी गौरी खानने ठेवलाय नवस, नवरात्र उत्सवात गोडधोड खाणं सोडलं
ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतल्या सेशन कोर्टाने आर्यन खानच्या जामिनावरची सुनावणी २० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखचं मुंबईतलं निवासस्थान ‘मन्नत’मध्येही तणावाचं वातावरण आहे. आर्यनची आई गौरी खान ही आपल्या मुलाच्या अटकेनंतर चांगलीच चिंतेत असून तिने मुलाची सुटका व्हावी यासाठी नवस ठेवल्याचं कळतंय. […]
ADVERTISEMENT
ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतल्या सेशन कोर्टाने आर्यन खानच्या जामिनावरची सुनावणी २० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखचं मुंबईतलं निवासस्थान ‘मन्नत’मध्येही तणावाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
आर्यनची आई गौरी खान ही आपल्या मुलाच्या अटकेनंतर चांगलीच चिंतेत असून तिने मुलाची सुटका व्हावी यासाठी नवस ठेवल्याचं कळतंय.
Exclusive : सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, आर्यन खान तुरुंगात झालाय डिस्टर्ब
हे वाचलं का?
शाहरुख खानच्या परिवाराशी संबंधित जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवस ठेवला आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गौरी खान सातत्याने देवीकडे प्रार्थना करत असून तिने या दिवसांमध्ये कोणताही गोड पदार्थ खाणार नाही असं ठरवलं आहे.
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख आणि गौरी यांचा बराचसा वेळ वकीलांशी सल्लामसलत करण्यात जात आहे. प्रत्येक दिवसागणिक शाहरुख आणि गौरीची चिंता वाढत जात असल्याची माहिती शाहरुखच्या जवळच्या लोकांनी दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देवीचा फोटो ठेवला होता. त्या सुनावणीत आर्यनला जामीन मिळेल असं शाहरुख आणि गौरीला वाटत होतं परंतू असं झालं नाही.
ADVERTISEMENT
Drugs Case: आर्यन खान पुढचे 5 दिवस तुरुंगातच, आजही नाही मिळाला जामीन!
ADVERTISEMENT
याचसोबत शाहरुखने आपल्या बॉलिवूडमधील मित्रांना मन्नतवर न येण्याची विनंती केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फक्त सलमान खानच मन्नतवर आलेला पहायला मिळाला आहे. सलमान खानच्या सल्ल्यानुसारच आर्यन खानची केस आता सतीश मानेशिंदे यांच्याऐवजी समीर देसाई या निष्णात वकीलांकडे सोपवण्यात आली आहे.
मन्न्तवर भेटायला येण्याऐवजी आर्यनच्या सुटकेसाठी प्रार्थना करा अशी विनंती शाहरुख आणि गौरीने केल्याचं कळतंय. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या धाडसत्रात NCB ने आर्यन खानसह ८ आरोपींना अटक केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT