Girlfriend: ‘पैसे द्या अन् मला गर्लफ्रेंड बनवा…’, तरुणीची खुली ऑफर; पण…

ADVERTISEMENT

Girlfriend on rent charges money dates with single men
Girlfriend on rent charges money dates with single men
social share
google news

Girlfriend on rent charges money dates with single men : प्रत्येक मुलाला वाटते की त्याची एक गर्लफ्रेंड (Girlfriend) असावी. या गर्लफ्रेंडसोबत त्याने फिरावे, रोमान्स करावा, आपल्या भावना शेअर कराव्यात अशी त्यांची इच्छा असते. मात्र प्रत्येक मुलाला ते शक्य होत नाही. त्यामुळे आता सिंगल मुलांनाही (Single Boy) गर्लफ्रेंड मिळावी यासाठी एका तरूणीने भाड्याने गर्लफ्रेंड (Girlfriend on rent) देण्याची सर्विस सुरु केली आहे. या तरूणीचे फुल टाईम कामच भाड्याची गर्लफ्रेंड (Girlfriend on rent) बनण्याचे आहे. या सर्विसमध्ये तिने काही अटी देखील घातल्या आहेत, तसेच या सर्विससाठी ती पैसै देखील आकारते.त्यामुळे नेमकी ही सर्विस काय आहे? ते जाणून घेऊयात.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मुळची जापानची असलेली किर्मी ही भाड्याने गर्लफ्रेंड (Girlfriend on rent) देण्याची सर्विस देते. जे तरूण एकटेपणा, उदासीनता अथवा काही समस्येपासून झुंजत असतात, अशा तरूणांना किर्मी स्वत: चा मौल्यवान वेळ देते. या वेळेबद्दल ती त्यांच्याकडून पैसै आकारते. यामध्ये काही तरूण गर्लफ्रेंड समजून तिच्यासोबत वेळ घालवतात, तर काही तरूण जवळचा मित्र समजून तिच्यासोबत राहतात.

हे ही वाचा : लग्नात नवरीची भलतीच मागणी, म्हणाली… नवऱ्यासह नातेवाईक झाले अवाक्!

तरूणीची अट काय?

जापानमध्ये पेड डेटींग ही सामान्य गोष्ट आहे. या सर्विसला तिने आता मेक्सिकोमध्ये सुरु केले आहे. किर्मीने भाड्याने गर्लफ्रेंड (Girlfriend on rent) देण्याच्या सर्विसला पेड डेटींग नाव दिले आहे. या सर्विसमध्ये तिने एक अट देखील ठेवली आहे. यानुसार डेट करताना ती कोणासोबतही फिजिकल होणार नाही, अशी अट तिने घातली आहे. किर्मी तिच्या डेटसोबत सिनेमा पाहते, फिरते, शॉपिंग करते या सर्व गोष्टींसाठी ती तरूणांकडून पैसे आकारते. या सर्विससाठी ती तरूणांकडून 40 ते 50 हजार रूपये आकारते. यामुळे तिची महिन्याची कमाई साधारण 10 लाख रूपये होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किर्मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे.इन्स्टाग्रामवर तिला 40 हजाराहून अधिक लोक फॉलो करतात तर टीकटॉकची फॅनफॉलोईंग लाखांच्या घरात आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिचे खुप फॉलोवर्स आहेत, या फॉलोवर्सना तिला भेटायचे असते. त्यामुळे फॅन्सना तिला भेटण्याची इच्छाही पुर्ण होईल आणि यामधून तिची कमाई देखील होईल यासाठी तिने ही सर्विस सुरु केली आहे.

हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?

दरम्यान किर्मीच्या या पेड डेटींगला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.तिच्या या पेड डेटींगमुळे तिची खुप कमाई होत आहे. तिच्या या सर्विसची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT