गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न 23 सप्टेंबरला होणार साकार; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत धावणार रेल्वे
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, असं स्वप्न होतं. मुंडेंचं स्वप्न होताना दिसत आहेत. यापूर्वी फक्त परळी येथे रेल्वेचे स्थानक होते. आता बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगरदरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या […]
ADVERTISEMENT

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, असं स्वप्न होतं. मुंडेंचं स्वप्न होताना दिसत आहेत. यापूर्वी फक्त परळी येथे रेल्वेचे स्थानक होते. आता बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगरदरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रामुख्याने आष्टी परिसरातील लोकांना आता रेल्वेतून प्रवास करायला मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश
अहमदनगर-बीड- परळी रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक वर्षाची मागणी होती, ती आता प्रत्यक्षात उतरत आहे. आष्टी ते अहमदनगर रेल्वे प्रत्यक्षात धावणार असून त्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे.
काही महिन्यापूर्वी या ट्रॅकची रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रकवर तपासणीवेळी 120 किमी प्रती तास वेगाने रेल्वे धावून ट्रायल घेण्यात आला होता. त्यामुळे या ट्रॅकवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.