आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंग, रिलायन्समध्ये नोकरी; कोण आहे गोरखनाथ मंदिराबाहेर हल्ला करणारी व्यक्ती
उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील गोरखनाथ मंदिरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना आज घडली. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी याने गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, आरोपीबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणारा आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरमधीलच सिव्हील लाईन […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील गोरखनाथ मंदिरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना आज घडली. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी याने गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, आरोपीबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणारा आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरमधीलच सिव्हील लाईन परिसरातील रहिवाशी आहे.
अहमद मुर्तजा अब्बासी यांने २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. आयआयटी मुंबईतून पदवी घेतल्यानंतर अहमद मुर्तजा अब्बासी याने दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली. २०१५ मध्ये इंजिनिंरिंगची पदवी घेतल्यानंतर अहमद मुर्तजा अब्बास याने रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम केलं.
त्यानंतर त्याने एस्सार पेट्रोकेमिकल्समध्येही काम केलं. अहमद मुर्तजा अब्बासीच्या कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे त्याची मानसिक स्थिती ठिक नाही. २०१७ पासून त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे.