सरकार म्हणतं WhatsApp यूजर्संनो घाबरु नका, सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आहेत नवे नियम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: सरकारच्या डिजिटल नियमांबद्दल नुकतीच व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की नवीन नियम कंपनीकडून यूजर्संना देण्यात येणाऱ्या ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’मध्ये हस्तक्षेप करतात. आता यालाच उत्तर देताना सरकारने असे म्हटले आहे की, ते लोकांच्या ‘गोपनीयतेच्या अधिकाराचा’ आदर करते आणि त्यांचा प्लान याचे उल्लंघन करावा असा अजिबात नाही. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी Koo वर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.

ADVERTISEMENT

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘सरकार लोकांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करते. सामान्य व्हॉट्सअॅप यूजर्सने या नवीन नियमांची भीती बाळगण्याची गरज नाही. नियमात नमूद केल्यानुासर विशिष्ट गुन्हे दाखल करण्यास कोणत्या मेसेजपासून सुरुवात झाली आणि ती कोणी केली हे शोधणं हा त्याचा मुख्य हेतू आहे.’

Twitter, Facebook आणि What’s App चं भारतात काय होणार?

हे वाचलं का?

ते पुढे म्हणाले की, ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवीन नियम बनविण्यात आले आहेत. प्रश्न विचारण्याच्या अधिकारासह सरकार टीकाकारांचं देखील स्वागत करतं. नवे नियम हे फक्त सोशल मीडियाच्या सामान्य यूजर्संना सक्षम करतात जेव्हा ते गैरवर्तन आणि गैरवापराचे बळी ठरतात.’

रवीशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, ‘आक्षेपार्ह मेसेजची सुरवात कुठून झाली याची माहिती देणे हे केवळ भारतीय सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार याच्याशी संबंधित गुन्ह्यांशी असणार आहे.

ADVERTISEMENT

Right to Privacy हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार, What’s App च्या याचिकेवर केंद्र सरकारचं कोर्टात उत्तर

ADVERTISEMENT

ते पुढे असंही म्हणाले की, ‘नव्या नियमाअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी, अनुपालन अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची स्थापना करण्याची गरज आहे जेणेकरून सर्व सोशल मीडिया यूजर्सकडे तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ मिळू शकेल.’

काय आहेत नवे नियम?

केंद्र सरकारने नव्या नियमांची घोषणा 25 फेब्रुवारी रोजी केली होती. या नव्या नियमाअंतर्गत ट्विटर, फेसबुक इंस्टाग्राम आणि Whatsapp सारख्या बड्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (ज्यांचे देशात 50 लाखांहून अधिक यूजर्स आहेत.) त्यांना अतिरिक्त उपाय करावे लागणार आहेत. यामध्ये तक्रार निवारण अधिकारी, अनुपालन अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची स्थापना आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास या सोशल मीडिया कंपन्यांना आपल्या इंटरमीडिएरी दर्जा गमावावा लागू शकतो. ही अट त्यांना कोणत्याही थर्ड पार्टीची माहिती आणि त्यांनी ‘होस्ट’ केलेल्या डेटासाठी जबाबदाऱ्यांपासून सूट आणि संरक्षण देते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT