राज्यपाल कोश्यारींनी पंतप्रधानांसमोरच छेडला औरंगाबादचा पाणी प्रश्न, म्हणाले…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दुपारी त्यांनी पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर ते राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थीत राहिले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पंतप्रधानांसमोरच राज्य सरकारच्या तक्रारींचा पाढा वाचला आहे. महामंडळ नेमणुका, औरंगाबादचा पाणी प्रश्न, विविध योजनांची सद्य परिस्थीती याबाबत राज्यपालांनी पंतपधानांचे […]
ADVERTISEMENT
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दुपारी त्यांनी पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर ते राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थीत राहिले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पंतप्रधानांसमोरच राज्य सरकारच्या तक्रारींचा पाढा वाचला आहे. महामंडळ नेमणुका, औरंगाबादचा पाणी प्रश्न, विविध योजनांची सद्य परिस्थीती याबाबत राज्यपालांनी पंतपधानांचे लक्ष वेधले.
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून महामंडळाच्या नेमणुका झालेल्या नाहीत. राज्यात अशा काही सिंचन योजन आहेत त्या २० वर्षांपासून सुरु आहेत. काही योजनांचे काम ७० ते ८० टक्के पुर्ण झाले आहे परंतु त्याचा लाभ लोकांना मिळत नाहीये. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालावे. औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा देखील राज्यपालांनी आवर्जून उल्लेख केला. आणि औरंगाबादचा पाणी प्रश्न पंतप्रधानांनी सोडवावा अशी मागणीही राज्यपालांनी त्यांच्याकडे केली आहे.
‘मोदी है तो मुमकीन है’
औरंगाबादमध्ये दर पाच, सात दिवसांनी पाणी येते, हे योग्य नाही. मोदी है तो मुमकीन है असे अरुण जेटली म्हणाले होते, आता मी ही म्हणतो की मोदी है तो मुमकीन है त्यामुळे रखडलेल्या सर्व योजना पुर्ण व्हाव्यात अशी विनंती राज्यपालांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी प्रेम आणि विश्वासामुळे आपण महाराष्ट्रात आलो, माझी येण्याची इच्छा नव्हती असेही राज्यपाल म्हणाले.
हे वाचलं का?
‘मुख्यमंत्र्यांना ‘हे’ कसे वाटले माहित नाही’
विद्यापीठांमध्ये होणारे कार्यक्रम इंग्रजीमध्ये होते, मी त्यांना सांगितले की सर्व कार्यक्रम मराठीतून करावे हा निर्णय मुख्यमंत्र्यांना कसा वाटला हे माहित नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नागपूर आणि मुंबई विद्यापीठात काही उपक्रम राबवल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली आहे. लोकांना राजभवन हे राजभवन नाहीतर लोकभवन वाटावं असेही ते म्हणाले.
राज्यपाल आणि ठाकरे संघर्ष जुनाच
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष मागील अनेक काळापासून पाहिला आहे. मग ते १२ आमदारांचा विषय असो, विधानसभा अध्यक्ष पद असो यामध्ये राज्यापाल विरुद्ध ठाकरे सरकार संघर्ष पाहायला मिळाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT